मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मी धावून येईल; उद्धव ठाकरे यांचाही शब्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही ९ मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपलं प्रेम कायम राहिल असं म्हटलं आहे. आपण नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या संकटकाळात त्यांच्यासाठी धावून येईल असं ते म्हणाले होते. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मी धावून येईल; उद्धव ठाकरे यांचाही शब्द
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 8:46 PM

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींनी काल परवा एक मुलाखत दिली. अनेकांनी मेसेज केले मोदींचं तुमच्यावर प्रेम आहे. मोदीजी तुम्ही येवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होते. मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे. मी खोलात जात नाही. पुरावा कोण कुणाला देणार. हे खरे असेल. तुम्ही माझी अस्थेवाईक विचारपूस करत होता तर खालच्या लोकांना माहीत नव्हतं का. पण तुमच्या खालचे माणसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गाठीभेटी घेत होते. तेव्हा तुम्हाला माहीत नाही की हे काय करत होते. एकनाथ खडसे यांचा फोन आला होता. युती तोडण्याचे वरुन आदेश होते. हे तुम्हाला माहित नव्हते का?

‘अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या खोलीत सांगितले होते की, मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षात वाटले जाईल. पण तुम्ही मला खोटे ठरवले. मोदी सरकार नाही हे दंगली सरकार आहे. २०१४ ला काय बोलले हे २०१९ ला आठवत नाही. २०१९ ला काय बोलले हे २०२४ ला आठवत नाही.’

उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी शस्त्रक्रिया झाली असताना कटकारस्थान करत होते. मोदी तुम्हाला माहीत नव्हतं. तुमचे चेलेचपाटे काय करतात. तुम्हाला सांगता तुमच्यावर संकट आलं तर उद्धव ठाकरे धावून येईल. तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावर आला. तुम्ही आधी स्वतला आवर घाला.

‘मी हिंदुत्व सोडलं. मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं तुम्ही म्हणता. मी २०१४ला तुळजाभवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. तेव्हा संध्याकाळी खडसेंचा फोन आला. युती तोडल्याचं सांगितलं. तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं खाली काय चाललंय. युती तोडलीय. ओमराजेंना मत म्हणजे मला मत. प्रज्वल रेवन्ना यांचे अनेक व्हिडीओ आले आहेत. तरीही तुम्ही म्हणता मला मत. बाळासाहेबांचं कर्ज आहे. म्हणता. बाळासाहेब म्हणून नका. नुसतं. ते हिंदूहृदयस्रमाट म्हणा. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ का कचरता. तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानता. मग अमित शाह यांनी शब्द का मोडला. मी आईवडिलांची शपथ घेतली आणि तुळजाभवानीची शपथ घेतली आणि सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं होतं. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो. कर्जमाफी करून दाखवीन. करून दाखवलं. कापसाला भाव दिला.’ असं ही उद्धव ठाकरे म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.