त्यावेळी दुर्लक्ष केलं, आता लक्ष केंद्रित केलंय, शंभूराज देसाई यांचा रोख कुणाकडं
चाळीस आमदारांच्या मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित केले.
मुंबई : मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आरटीआयमार्फत आलेली माहिती ही खरी आहे. म्हणजे ही माहिती अधिकृत आहे. आता ह्या पळवाटा काढायचा प्रयत्न विरोधक करत आहे. आता सूर्यप्रकाशात स्वच्छ झालेला आहे की, गेल्या सरकारच्या काळात जो वेदांता प्रकल्प आता राज्याच्या बाहेर गेलाय. त्याच्या बाबतीत मंत्रिमंडळ उपसभेतील बैठक झालेली नाही.हाय पॉवर कमिटीची बैठक झाली नाही. या प्रकल्पाला गती देण्यासाठी किंवा या प्रकल्पाला ज्यावेळी प्रकल्प राज्यामध्ये येत होता. त्यावेळी ज्या काही सुविधा, सवलती, इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासंदर्भात जी राज्याची प्राथमिकता होती त्याच्या बाबतीत कधी बैठका झालेल्या नाहीत. ते न झाल्यानं आज अशा पद्धतीनं हा प्रकल्प केवळ महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळं हा प्रकल्प बाहेर गेला. हे आता आरटीआयच्या माहिती कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी बाहेर आलेलं आहे.
शंभूराज देसाई यांनी सांगितलं की, भागवत कराड हे केंद्रामध्ये वित्त विभागाचे राज्यमंत्री आहेत. ते स्वतः मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. राज्याचे प्रतिनिधीत्व केंद्रीय मंत्री म्हणून ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये करताय.जेव्हा त्यांनी एवढा मोठा सोलर प्रकल्प मराठवाड्याच्या जायकवाडी प्रकल्पाच्या फ्लोटिंग वॉटरवरती आणायचा प्रकल्प प्रयत्न केला होता. तेव्हा खरंच त्याला एनओसी देणं गरजेचं होतं.
केंद्राच्या मदतीने एवढा मोठा प्रकल्प मराठवाड्यासारख्या ठिकाणी येत होता. पण एनओसी द्यायची होती तीसुद्धा साधी जर त्यावेळेसच्या जलसंपदा मंत्र्यांनी दिली नाही, असा आरोप शंभूराज देसाई यांना केला.
उद्धव ठाकरे यांनी व ठाकरे परिवाराची ती परंपरा आहे.पद्धत आहे की, सगळ्या बैठका सेना भवनला किंवा मातोश्रीमध्ये होतात. ठीक आहे आता यात्रा सुरु झाल्यात. चाळीस आमदारांच्या मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित केले. आमच्याबरोबर सहकार्य करणारे आमच्याबरोबर मित्र पक्षाच्या आणि अपक्ष 10 आमदारांच्या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केले. त्यांना कुठे लक्ष केंद्रित करायचे हा त्यांचा विषय आहे.
पण आम्ही हे अगोदरच सांगत होतो आम्ही 40 आमदार आहोत. तीन वर्षापूर्वी हेच माननीय उद्धवजींना सांगत होतो की, साहेब आमदारांचा ऐकून घ्या. आमदारांच्या मतदारसंघातली काम होत नाही. आमदारांच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्रास होतोय. हे आम्ही तीन वर्षांपूर्वी अडीच वर्षांपूर्वी माननीय उद्धवजींना याठिकाणी सांगत होतो. पण त्यावेळी तिकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप शंभूराज देसाई यांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे पहिल्या दिवशी स्पष्ट केलेल्या आहेत. या 50 आमदार जे आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आहोत. त्यातला एकही आमदार विधानसभेच्या निवडणुकीला मी पराभूत होऊ देणार नाही.
आमच्या मतदारसंघांमध्ये लोकांमध्ये आम्ही आहोत. त्यामुळे अशा कितीही बैठका घेतल्या. कितीही दौरे काढले तरी आमच्या आमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आमची लोक आमची जनता आमची कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत हा मला विश्वास आहे, अशी अपेक्षा शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.