VIDEO: महापालिकेच्या अधिकाऱ्यांची mohit kamboj यांच्या घरी धडक, कंबोज म्हणतात, पालिकेने एक एक इंच जमीन तपासावी
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घराची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले असून गेल्या तासाभरापासून कंबोज यांच्या घराची झाडाझडती सुरू केली आहे.
मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्या घराची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे (bmc) अधिकारी पोहोचले आहेत. अनधिकृत बांधकामप्रकरणी (illegal construction) महापालिकेचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले असून गेल्या तासाभरापासून कंबोज यांच्या घराची झाडाझडती सुरू केली आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांनी नोटीस दिली होती. त्यानुसार ते तपासणी करायला आले आहेत. मी त्यांना सहकार्य करणार आहे. त्यांनी घराची इंच इंच जमीन तपासावी. एक एक स्क्वेअर फुटाची जमीन खुशाल चेक करावी आम्हाला काही फरक पडणार नाही, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. महापालिकेचे अधिकारी पाहणी करतील. त्यानंतर त्यांचा अहवाल करतील. हा अहवाल झाल्यानंतर मला नोटीस पाठवतील. त्यावर मी त्यांना उत्तर देईल, असंही कंबोज यांनी स्पष्ट केलं.
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याने त्यांना महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यानंतर पालिकेचे अधिकारी कंबोज यांच्या घरी दाखल झाले. पालिका अधिकाऱ्यांचं एक पथक त्यांच्या घरी दाखल झालं असून त्यांच्या घराची पाहणी करणार आहेत. संपूर्ण 14 मजल्याची पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. मात्र, या तपासणीवेळी प्रत्येक मजल्यावर आपण अधिकाऱ्यांसोबत जाणार नाही. अधिकाऱ्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू देणार आहे. त्यांना संपूर्ण सहकार्य केलं जाणार आहे, असं कंबोज यांनी स्पष्ट केलं.
माझ्या 12 मालमत्तांना नोटिसा पाठवल्या
माझ्या घरात काही अनधिकृत बांधकाम झालं नाही. जर असेल तर महापालिकेने तपासून सांगावे.माझ्या सुमारे 12 प्रॉपर्टींना महापालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत. माझ्या विरोधात काही सापडलं नाही. त्यामुळे आता माझ्या घराला नोटीस पाठवण्यात आली आहे. जी नोटीस पाठवण्यात आली आहे, ती घाई गडबडीत पाठवण्यात आली आहे. कारण त्यात कसला ही उल्लेख नाही, असं ते म्हणाले.
आयएसएस, आयपीएस अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार
पण येणाऱ्या काळात मी एका आयएस आणि एका आयपीएस अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. एका आयएस अधिकाऱ्याने अमेरिकेत प्रॉपर्टी घेतली आहे. ती समोर आणणार आहे. मी घाबरणार नाही. मुंबईत अशी अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. ती समोर आणणार आहे. त्यावेळी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल काय कारवाई करतात ते मी पाहणार आहे, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : दोन वर्षानंतर मनसेचा मुंबईत पाडवा मेळावा
अत्यावश्यक सेवांसाठी BS6 डिझेल वाहनांच्या नोंदणीला परवानगी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय