Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD alerts Weather updates : दोन आठवडे तापमान कसे राहणार, पाऊस कुठे पडणार?

IMD alerts Weather updates : मे महिना आला तरी ऊन तापत नाही. अनेक शहरांचे तापमान ३५ अंशांच्या खाली आहे. तापमानातील बदलासंदर्भात हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. या सर्वांचा परिणाम शेतीवर होणार आहे.

IMD alerts Weather updates : दोन आठवडे तापमान कसे राहणार, पाऊस कुठे पडणार?
IMD
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 9:33 AM

पुणे : मे महिना सुरु झाला आहे. दरवर्षी या दरम्यान अंगाची लाहीलाही होते. परंतु गेल्या चार दिवसांपासून राज्यातील वातावरण उन्हाळ्यासारखे नाही. उन्हाळा असताना अनेक शहरांचे तापमान ३५ अंशांच्या खाली आहे. पुणे, मुंबईत ३२ आणि ३३ अंश तापमान आहे. यामुळे मे महिन्यातील अंगाची लाहीलाही जाणवत नाही. दुसरीकडे अवकाळीचे संकट कायम आहे. कोकण आणि गोव्यात ४ ते ७ मे पर्यंत काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात ४ ते ८ मे पर्यंत यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात ४ ते ७ मे दरम्यान अवकाळीचे संकट आहे तर विदर्भात ४ ते ६ मे पर्यंत पाऊस पडणार आहे.

तापमान कसे असणार

राज्यात ५ ते ११ मे दरम्यान तापमान वाढीतून दिलासा मिळणार आहे. या काळात तापमान ४० अंशाच्या आत असणार आहे. परंतु त्यानंतर १२ ते १८ मे दरम्यान तापमानात वाढ होणार आहे. राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूरचे नोंदवले गेले. सोलापूरमध्ये ३६.६ अंश तापमान होते तर मुंबईत ३३.२ अंश तापमान होते. पुण्याचे तापमानही ३३.९ अंशांवर होते.

हे सुद्धा वाचा

पुण्यात पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची हालचाल सुरू झाली आहे. यामुले 6 मे पासून ढगांची गर्दी होणार आहे. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 9 मेपर्यंत सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.

धुळ्यात वातावरणात बदल

धुळे शहरात सध्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण राहते, दुपारी ऊन आणि रात्री मात्र पाऊस पडतो. गेल्या काही दिवसांपासून सकाळी सूर्याचे दर्शन होत नाही. दुपारी तापमान 37 अशांपर्यंत राहते. तर सायंकाळी ढग दाटून येत रिमझिम पाऊस पडतो. यामुळे प्रचंड प्रमाणात उकडा निर्माण झाला आहे.

नांदेडमध्ये पाऊस

नांदेडमध्ये रात्री उशीरा सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पहाटे चार वाजेपर्यंत झोडपून काढलंय. रात्रभर कोसळलेल्या या पावसाने नांदेडचे कमाल तापमान चोवीस अंशावर घसरलय. त्यामुळे वातावरणात गारठा तयार झालाय. सातत्याने बरसणाऱ्या या अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये साथीच्या आजारात देखील वाढ झालीय.

नंदुरबारमध्ये अवकाळी

नंदुरबार आणि नवापूर शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेल्या कांदा पपई केळी या पिकांचे नुकसान होणार आहे. तसेच विक्रीसाठी मार्केटात आणलेलं कडधान्यांच्या देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.