Heat Wave : मध्य महाराष्ट्रासह राज्यात उष्णतेची लाट, चार दिवस उन्हाचे चटके, चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक तापमान

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात पुढील तीन ते चार दिवसात राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट येऊ शकते , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Heat Wave : मध्य महाराष्ट्रासह राज्यात उष्णतेची लाट, चार दिवस उन्हाचे चटके, चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक तापमान
temperatureImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 4:21 PM

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून राज्यात पुढील तीन ते चार दिवसात राज्यात उष्णतेची  लाट (Heat Wave) येऊ शकते , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30,31 मार्च आणि 1 ते 3 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे. हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरत असल्याचं समोर येत असून मार्च महिन्यात तापमान 40 अंशाच्या पुढं गेलं आहे. पुढील तीन चे चार दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तापमान वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान 43.4 अंशावर पोहोचलं होतं. चंद्रपूर हे जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे.

प्रादेशिक हवामान विभागाचं ट्विट

कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवणार?

30 मार्च : अहमदगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर

31 मार्च : अहमदनगर, सोलापूर, जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव

1 एप्रिल : जळगाव, बुलडाणा, अकोला, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अहमदनगर आणि सोलापूर

2 एप्रिल : बुलडाणा, जालना, परभणी, हिंगोली आणि अकोला

एएनआय या वृत्तसंस्थेचं ट्विट

चंद्रपूरमध्ये सूर्य कोपला, 43.4 अंश तापमानाची नोंद

चंद्रपुरात सूर्य कोपल्याचे चित्र आहे. आज जगातील तिसऱ्या उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश झालाय. मंगळवारी चंद्रपुरात 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. देशाच्या उत्तर भागातून येणारे उष्ण वारे या अचानक तापमानवाढीस कारण ठरले आहेत. यामुळे राज्यातील हवामान अति उष्णतेकडे जाण्याची शक्यता आहे. विदर्भातील शहरे अधिक तापमानाची होऊ लागली आहेत. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील तापमान देखील 40 अंशाच्या वर गेलं आहे.

उष्णतेची लाट कायम राहणार

भारतीय हवामान विभागाचे नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ आर के जेनमानी यांनी नवी दिल्लीतील तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याची माहिती दिली. 1 ते 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहिल. मध्य भारत आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवेल, असं जेनमानी यांनी म्हटलंय. 2 एप्रिल नंतर तापमान कमी होईल, असं त्यांनी म्हटलंय.

इतर बातम्या:

UP Board 2022 : उत्तर प्रदेशात बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला, 500 रुपयांना विक्री, 24 जिल्ह्यात परीक्षा रद्द

त्यांना बेघर होऊ देऊ नका, रेल्वेमार्गालगच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा-मनोज कोटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.