Hit Wave Alert : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला ‘या’ तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Hit Wave Alert : आता हवामान विभागाने पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ जाणवली होती. नवी मुंबई सह इतर ठिकाणी तर पारा 41 अंशावर गेला होता.

Hit Wave Alert : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला 'या' तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Hit Wave
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 3:20 PM

महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. सध्या उन्हाळा सुरु असून 10-15 मिनिट चालल्यानंतर अंग घामाने भिजून निघतय. उष्णतेमुळे अंगाची काहिली होतेय. त्यामुळे सकाळ-दुपारच्यावेळी शक्यतो लोक घराबाहेर पडण्याच टाळत आहेत. त्यात आता हवामान विभागाने पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसात तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा बसतील. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये चक्रीय वात विरोधी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे 27 आणि 28 एप्रिल या दोन दिवसात तापमानात वाढ होऊ शकते, असं हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी माहिती दिली आहे. मुंबईसाठी दुसऱ्यांदा हा इशारा देण्यात आला असून याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ जाणवली होती. नवी मुंबई सह इतर ठिकाणी तर पारा 41 अंशावर गेला होता. मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने काय सल्ला दिलाय?

हवामान विभागाने नागरिकांना दीर्घकाळ उन्हात रहाण टाळा असा सल्ला दिला आहे. पुरसे पाणी प्या, सैल कॉटनचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. दुपारच्यावेळी घराबाहेर पडताना चेहरा झाकून घ्या. टोपी घाला, छत्री वापरा असा सल्ला दिला आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.