Monsoon Alert : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, कोकणात 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार

हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी कोकणात 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूरस्थितीनिर्माण होऊ शकते, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Monsoon Alert : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, कोकणात 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 3:39 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबईकडून राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी कोकणात 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूरस्थितीनिर्माण होऊ शकते, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

आजच्या दिवसासाठी पावसाचा अंदाज नेमका काय?

हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. उस्मानाबाद, धुळे, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

23 जुलैची पावसाची काय स्थिती?

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

24 जुलै रोजी काय स्थिती?

24 जुलै रोजी राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. त्या दिवशी राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

25 जुलैसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 26 जुलैसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातही अतिवृष्टीचा इशारा

विदर्भात मुसळाधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. IMD कडून विदर्भात दोन दिवस ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ‘चंद्रपूर, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर, नागपरूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर विभागाचे संचालक मोहनलाल शाह यांनी ही माहिती दिलीय.

विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा

एकीकडे मुंबई आणि कोकणात मुसळाधार पाऊस पडतोय, तर दुसरीकडे विदर्भातंही मुसळाधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात ॲारेंज अलर्ट जारी केलाय. विदर्भातील गडचीरोली आणि चंद्रपुर या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाची शक्यता आहे, असं याबाबत नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

इतर बातम्या:

VIDEO : विदारक वास्तव ! वृद्धेला प्रचंड ताप, हतबल नातेवाईकांनी रुग्णालयात नेण्यासाठी ओढ्याच्या पाण्यातून चालवत नेलं

कोकणाला झोडपलं, आता विदर्भाचा नंबर, IMD कडून विदर्भाला ऑरेंज अ‌ॅलर्ट, चंद्रपूर गडचिरोलीत अतिवृष्टी तर नागपूरला मुसळधार

IMD predicted five days forecast for Maharashtra issue Red Alert to raigad, ratnagiri, sindhudurg, satara, pune and kolhapur

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.