अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा फटका, रब्बी पिकांचे नुकसान

weather update | राज्यातील वातावरणात बदल होऊ लागला आहे. हिवाळाच्या गारवा जाऊन आता उन्हाचे चटके सुरु झाले आहे. त्याचवेळी आता अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हे संकट असणार असल्याची माहिती आयएमडीने दिली.

अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा फटका, रब्बी पिकांचे नुकसान
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 9:10 AM

गजनान उमाटे, नागपूर, दि. 11 फेब्रुवारी 2024 | राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. सरासरी न गाठता यंदा मॉन्सूनने निरोप घेतला. त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. यंदा खरीपचे उत्पादन कमी झाले. तसेच रब्बीची लागवड कमी झाली. कारण राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये जलसाठा नव्हता. यामुळे रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन दरवर्षीप्रमाणे सोडता आले नाही. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा कमी असल्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पाण्याचा वापर करावा लागणार आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे वातावरण बदलले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सुरु झाला आहे. त्याचवेळी हवामान विभागाने चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे.

नागपूरसह विदर्भाच्या काही भागात शनिवारी रात्री गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यातील काही गावात गारपीटसह पाऊस झाला. यामुळे गहू,हरभरा,कांदा,भाज्यासह रब्बी पिकांचे अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झाले आहे. विदर्भाच्या अमरावती, वर्धा,यवतमाळ जिल्ह्यात गारपीट तर गोंदिया जिल्हयात पावसाच्या सरी कोसळल्या.

काय आहे हवामान विभागाचा इशारा

नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. ११, १२ आणि १३ फेब्रुवारीसाठी हा अलर्ट दिला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, काढणीला आलेला हरभरा, तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

का पडणार पाऊस

मध्य भारतात तयार झालेल्या सायक्लॅामीक सर्क्यूलेशनमुळे विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान रिमझिम पाऊस पडू शकतो. 10 आणि 11 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये पाऊस पडेल. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये 12 ते 15 फेब्रुवारीदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस

पश्चिम बंगालमध्ये १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडू शकतो. 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला, तेलंगणामध्ये १० आणि ११ फेब्रुवारीला आणि केरळमध्ये १४ ते १५ फेब्रुवारीदरम्यान हलका पाऊस पडू शकतो.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.