मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस, पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी

घटनापीठाच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस, पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी
शेतकरी आंदोलन : इंटरनेट बंदीचा मुद्दा गेला सर्वोच्च न्यायालयात
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 6:50 AM

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण, आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. यातून मराठा समाजातील नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. घटनापीठाच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे. (important day for Maratha reservation hearing before a 5 judge bench of Supreme Court for first time)

मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. खंडपीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे. त्यामुळे 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आरक्षणावर सुनावणी होणार असल्यानं मराठा नेत्यांचा भुवया उंचावलेल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय?

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

12% शैक्षणिक, तर नोकरभरतीतील 13% आरक्षणाला स्थगिती

SEBC अंतर्गत मिळालेल्या आरक्षण स्थगित

मेडिकल प्रवेशात मात्र SEBC आरक्षण कायम

SEBC नुसार भरती व प्रवेश नको : सुप्रीम कोर्ट

मराठा आरक्षणाचा खटलाही घटनापीठापुढे

पाच किंवा त्यापेक्षा जास्त न्यायमूर्ती घटनापीठावर राहणार

खंडपीठावर कोण कोण? न्या. अशोक भूषण न्या. नागेश्वर राव न्या. अब्दुल नजीर न्या. हेमंत गुप्ता न्या. रवींद्र भट

स्थगिती देताना SC काय म्हणाले? 1. मराठ्यांना आरक्षणाची गरज सरकार पटवून देऊ शकले नाही 2. 50% पलीकडे जाण्यासाठी अपवादात्मक, अतिविशेष स्थिती पटवून देता आले नाही 3. मराठा आरक्षण वैध ठरवण्यात HC चुकले 4. अपवादात्मक, अतिविशेष स्थिती HC ने कशी मान्य केली? 5. 2020-2021 साठी मराठा आरक्षण लागू होणार नाही

मराठ्यांना आरक्षण किती? नोकरभरतीत 13% शैक्षणिक 12%

जाणून घ्या, महाराष्ट्रात आरक्षणाचा टक्का 62% OBC 19% SC 13% ST 7% EWS 10% SBC 2% NT(A) विमुक्त 3% NT(B) बंजारा 2.5% NT(C) धनगर 3.5% NT(D) वंजारी 2 %

मराठा आरक्षणासाठी युक्तिवाद काय?

1. महाराष्ट्रातच नव्हे तामिळनाडूतही 50% मर्यादेबाहेर आरक्षण 2. 10% EWSआरक्षणाद्वारे संसदेनेही 50% मर्यादा ओलांडली 3. 50% ची मर्यादा घालणाऱ्या साहनी निकालास 30 वर्षे लोटली 4. मंडल आयोगानुसार 20 वर्षानंतर फेरआढावा घेता येतो

शैक्षणिक आरक्षण

राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलं. मात्र नोकरीतील आरक्षणाला हायकोर्टाने यापूर्वी स्थगिती दिली होती. त्यानंतर आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी शैक्षणिक आरक्षणालाही स्थगितीची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने मराठा समाजाचं शैक्षणिक आरक्षण अबाधित ठेवलं होतं. (important day for Maratha reservation hearing before a 5 judge bench of Supreme Court for first time)

इतर बातम्या – 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी; जाणून घ्या, संपूर्ण घटनाक्र

कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता एक चांगला निर्णय येईल; अमोल मिटकरी आशावादी

(important day for Maratha reservation hearing before a 5 judge bench of Supreme Court for first time)

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.