काका विरुद्ध पुतण्या, बाप विरुद्ध लेक; शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीचे वैशिष्ट्ये काय?

शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बारामती, अहेरी आणि कागल सारख्या मतदारसंघात काका-पुतण्या, बाप-लेक आणि इतर प्रमुख नेत्यांमधील लढती पाहण्यासारख्या आहेत. या निवडणुकीत जनतेचा फोडाफोडीच्या राजकारणाला कसा प्रतिसाद असेल? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

काका विरुद्ध पुतण्या, बाप विरुद्ध लेक; शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीचे वैशिष्ट्ये काय?
शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीचे वैशिष्ट्ये काय?
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 7:52 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात आता खरी राजकीय लढाई होणार आहे. कारण गेल्या अडीच वर्षात फोडाफोडीच्या राजकारणानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जनतेचा या फोडाफोडीच्या राजकारणाला काय वाटतं? त्याचं उत्तर मतदानाच्या माध्यमातून समजणार आहे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेना दोन गटात विभागली गेली. त्यानंतर वर्षभरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठं बंड पुकारलं. त्यामुळे राष्ट्रवादीतही उभी फूट पडली. यानंतर आता विधानसभा निवडणूक होत आहे. प्रत्येक पक्षांकडून विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अजित पवार गटाकडून काल 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ही यादी समोर आल्यानंतर आता काही मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार यांच्यात थेट लढत होणार आहे. विशेष म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जास्त चर्चेची ठरण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघात शरद पवारांनी फार मोठी राजकीय खेळी केली आहे. त्यामुळे बारामतीत काय घडतं? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

शरद पवार गटाच्या उमेदवार यादीची वैशिष्ट्ये काय?

  • बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे.
  • पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली.
  • मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात उमेदवार घोषित करण्यात आला नाही.
  • मराठा बहुल बीड आणि माजलगावमधून पहिल्या यादीत उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.
  • भाजपमधून आलेले हर्षवर्धन पाटील, संदीप नाईक आणि समरजित घाटगे यांना उमेदवारी जाहीर झाली.
  • महाविकास आघाडीत अणुशक्तीनगरची जागा आम्हीच लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवारांची घोषणा करताना म्हणाले. त्यामुळे या जागेवर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक विरुद्ध शरद पवार गटाचा उमेदवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.

शरद पवार VS अजित पवार, प्रमुख लढती कोणत्या?

  • शरद पवार गटाकडून बारामतीत युगेंद्र पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत आता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे काका-पुतण्यात ही लढत असणार आहे.
  • अहेरी मतदारसंघात अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून धर्मरावबाबा यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बाप विरुद्ध लेक अशी ही लढत असणार आहे.
  • कागल मतदारसंघातील लढाई देखील काँटे की होणार आहे. कारण अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही लढत देखील चुरशीची असणार आहे.
  • इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे विरुद्ध शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांच्या लढत होणार आहे.

वाचा शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी

  1. इस्लामपूर – जयंत पाटील
  2. काटोल – अनिल देशमुख
  3. घनसावंगी – राजेश टोपे
  4. कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
  5. मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
  6. कोरेगाव – शशिकांत शिंदे
  7. बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
  8. जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
  9. इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  10. राहुरी – प्राजक्त तनपुरे
  11. शिरुर – अशोक पवार
  12. शिराळा – मासिंगराव नाईक
  13. विक्रमगड – सुनील भुसारा
  14. कर्जत – जामखेड – रोहित पवार
  15. अहमदपूर – विनायकराव पाटील
  16. सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
  17. उदगीर – सुधाकर भालेराव
  18. भोकरदन – चंद्रकांत दानवे
  19. तुमसर – चरण वाघमारे
  20. किनवट – प्रदीप नाईक
  21. जिंतूर – विजय भामरे
  22. केज – पृथ्वीराज साठे
  23. बेलापूर – संदीप नाईक
  24. वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
  25. जामनेर – दिलीप खोडपे
  26. मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
  27. मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
  28. नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
  29. किरोडा – रविकांत गोपचे
  30. अहिरी – भाग्यश्री आत्राम
  31. बदनापूर – बबलू चौधरी
  32. मुरबाड – सुभाष पवार
  33. घाटकोपर पूर्व – राखी जाधव
  34. आंबेगाव – देवदत्त निकम
  35. बारामती – युगेंद्र पवार
  36. कोपरगाव – संदीप वरपे
  37. शेवगाव – प्रताप ढाकणे
  38. पारनेर – राणी लंके
  39. आष्टी – मेहबूब शेख
  40. करमाळा – नारायण पाटील
  41. सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
  42. चिपळूण – प्रशांत यादव
  43. कागल – समरजीत घाटगे
  44. तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
  45. हडपसर – प्रशांत जगताप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.