हिंसक आंदोलनाचं नेतृत्व केल्याने ते आदराच्या लायक नाहीत, संभाजी राजेंवर जलील यांची टीका

विशाल गडावर जे घडले त्यावरुन राज्यात जंगल राज असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फक्त मुस्लिमांची मते हवेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

हिंसक आंदोलनाचं नेतृत्व केल्याने ते आदराच्या लायक नाहीत, संभाजी राजेंवर जलील यांची टीका
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 3:02 PM

इम्तियाज जलील यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फक्त मुस्लिमांची मते हवी आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊत काय बोलतात यावर मी उत्तर देणार नाही. जेव्हा त्यांच्याकडून काही चूक होते तेव्हा ते दुसऱ्याकडे बोट दाखवतात. आम्ही कोणाला मतदान करायचं हे आमच्या पक्षाचा अधिकार आहे. संजय राऊत किंवा त्यांच्या पक्षात आदेशाचे पालन करणारे लोक आम्ही नाहीत. आम्ही सक्षम आहोत. संजय राऊत यांना जी बडबड करायचे आहेत ती करू द्या.

संजय राऊत यांच्यावर टीका

मीही शिवसेनेवर आरोप करू शकतो, शिवसेनेचे मत फुटले आहेत आणि मातोश्रीच्या बाहेर पैशाचे ट्रक उभे होते. आरोप करण्यामध्ये काही तथ्य नाही. आमचा पक्ष वेगळा आहे. आम्ही कोणाला मतदान करायचं हे आम्ही ठरवू. संजय राऊत यांनी विचारधारेच प्रमाणपत्र आम्हाला देऊ नये. सगळ्या पक्षांना आम्ही भाजपच्या रांगेमध्ये उभा करतो. ज्या पद्धतीने भाजप आहे त्याच पद्धतीने सगळे पक्ष आहेत. आम्ही आमचे विचारधारा ठरवू. बाकिच्या लोकांच्या पोटात का दुखत आहे.

युती कोणासोबत करणार?

कोणासोबत युती करायची हे अजून ठरलेलं नाही मात्र युती करण्यापूर्वी मुस्लीम समाजाला यातून काय मिळणार हे अगोदर आम्ही जाणून घेणार आहोत. मोदींनी तर आम्हाला घुसखोर म्हणून घोषित केलं आहे. कोणत्याही पक्षाला पक्षाने आम्हाला लोकसभेत मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले नाही. तरीही मुस्लिमांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाला मतदान केलं आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत एकाही मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधीला उमेदवारी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा आहे की फक्त मुस्लीम समाजाची मतं पाहिजेत.

मनोज जरांगे यांचा विचार करु

मनोज जरांगे यांनी अजून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांना कोणता पक्ष काढायचा आहे हे त्यांनी अजून ठरवलेलं नाही. त्यांचा निर्णय ते घेतील आणि आमच्याकडे जर काही ऑफर आली तर आम्ही सकारात्मक पद्धतीने त्याचा विचार करू. मी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी यांना युतीचे प्रस्ताव दिले होते. तरीही त्यांनी आम्हाला सोबत घेतलं नाही. त्यामुळे मी आता पुढाकार घेणार नाही.

विधानसभेची निवडणूक लढवणार

विधानसभेची निवडणूक मी लढवावी असं ओवेसी साहेबांना वाटतं आणि त्याबद्दल त्यांनी सर्वे देखील सुरू केला आहे. मात्र कोणत्या मतदारसंघातून मी लढणार हे अजून निश्चित झालेलं नाही.

महाराष्ट्रातील मुस्लीम समाजामध्ये खूप रोष आहे. दोन दोन तास उन्हात उभा राहून मुस्लीम समाजाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मतदान केलं मात्र लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लीम उमेदवाराला पाडण्यासाठी काय काय प्रयत्न झाले हे आता सर्वांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे पूर्ण ताकतीने आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहोत. राजकीय पक्षांना लाज वाटायला हवी की विधान परिषदेवर मुस्लीम समाजाचा एक तरी उमेदवार द्यायला हवा होता. त्यामुळे या निवडणुकीत एमआयएम निश्चितच धक्का देणार आहे.

‘महाराष्ट्रात जंगल राज’

विशाल गडावर जे घडले ते पाहून असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जंगल राज आहे का याचे उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे. पोलिसांच्या हात कोणी बांधले आहेत, पोलिसांसमोर त्या ठिकाणी लाठीकाठी तलवार घेऊन आंदोलन त्या ठिकाणी आले होते तर या सगळ्या प्रकरणाचा नेतृत्व संभाजी महाराज करत होते ते स्वतःला शाहू महाराजांचे वंशज म्हणून घेतात त्यांनी शाहू महाराज वाचायला हवेत.

संभाजी महाराज दिल्लीपर्येंत गेले यामध्ये मुस्लीम समाजाचा खूप मोठा वाटा आहे. संभाजी महाराजांनी या हिंसक आंदोलनाच नेतृत्व केलं त्यामुळे ते आता आदराच्या लायक नाहीत. त्यामुळे संभाजी महाराज शाहू महाराजांचे वंशज होऊ शकत नाहीत. सध्या महाराष्ट्रात जी स्थिती निर्माण झाली आहे ते पाहून असं वाटतं की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांचा नाही. त्यामुळे प्रत्येकाने याचा विचार करावा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.