राजकारण करता करता बनली चोर, चंद्रपुरात राष्ट्रवादी युवतीची वाहन चोरी पकडली, वाचा काय होती मोडस ऑपरेंडी?

युवती गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेल्या गाड्यांवर बसून दूरपर्यंत ती ढकलत नेस असे. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने गाडी निर्जनस्थळी नेत असत. मेकॅनिक साथीदारांच्या मदतीने गाडी सुरु करून तिची विक्री केली जात असे.

राजकारण करता करता बनली चोर, चंद्रपुरात राष्ट्रवादी युवतीची वाहन चोरी पकडली, वाचा काय होती मोडस ऑपरेंडी?
चंद्रपूरमध्ये वाहने चोरणारी राष्ट्रवादी युवती अटकेत
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 2:39 PM

चंद्रपूरः शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी युवती प्रमुख कार्यकर्तीला  (Chandrapur Theft)अटक करण्यात आली आहे. वाहन चोरीसाठी ही युवती दोन साथीदारांच्या मदतीने विशिष्ट पद्धत वापरत असे. गर्दीच्या ठिकाणाहून ही विशिष्ट पद्धत वापरून या युवतीने मित्रांच्या सोबत अनेक गाड्या पळवल्याचे उघड झाले. दरम्यान, चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Chandpur police) पथकाने मोठ्या शिताफीने या तिघांचे कृत्य पकडले असून या प्रकरणी राष्ट्रवादी युवती कार्यकर्ती वैष्णवी देवतळे सह मनीष पाल आणि सौरभ चंदनखेडे अशा तीन आरोपींना कोठडी देण्यात आली आहे.

लॉक नसलेल्या वाहनावर युवतीची नजर

चंद्रपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरण्यासाठी या तिघांनी विशिष्ट प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरली होती. वैष्णवी देवतळे नावाची ही युवती आणि तिचे दोन साथीदार गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेल्या मोपेड गाड्या हेरत असत. ही युवती अशा गाड्यांवर बसून दूरपर्यंत ती ढकलत नेस असे. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने गाडी निर्जनस्थळी नेत असत. मेकॅनिक साथीदारांच्या मदतीने गाडी सुरु करून तिची विक्री केली जात असे.

तिघांच्या टोळीकडून 11 वाहने जप्त

चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत युवतीसह इतर दोन साथीदारांनी चोरलेली 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी सध्या या तिघांना कोठडीत ठेवले असून त्यांच्याकडून अन्य काही ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

मराठावाड्यातले सेतु सुविधा केंद्र हँग, औरंगाबाद विभागात महा-ऑनलाइनचे सर्व्हर डाऊन, शुक्रवारपासून कामे ठप्प

Purvanchal Expressway: पंतप्रधान मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने एक्सप्रेसवेवर उतरले, देशातल्या पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं केलं उद्घाटन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.