Nashik | हे भलतेच अवघड, नाशिकमध्ये चक्क 156 अधिकाऱ्यांची नावे मतदार यादीत दुबार, आता बोला…
नाशिक जिल्ह्यातील मतदारयादीतल्या दुबार नावांचा घोळ अजूनही सरता सरत नसून, आता चक्क 156 सरकारी अधिकाऱ्यांची नावे दुबार असल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील मतदार यादीतल्या दुबार नावांचा घोळ अजूनही सरता सरत नसून, आता चक्क 156 सरकारी अधिकाऱ्यांची नावे दुबार असल्याचे उघडकीस आले आहे. आतापर्यंत जवळपास 12 हजारांपेक्षा जास्त दुबार नावे मदतार यादी पनरिक्षण मोहिमेत वगळण्यात आली आहेत. येत्या 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदार यादी शुद्धीकरण
नाशिकमध्ये ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील दुबार नावाचा मुद्दा गाजतो आहे. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन मतदार संघाच्या याद्यांमध्ये शे-दोनशे नव्हे, तर चक्क तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दहा सदस्यांच्या पथकाने हा घोळ उघडकीस आणला आहे. त्यांनी तीन महिन्यांत मतदार यांद्याची अक्षरशः छाननी केली. तेव्हा नाशिक पश्चिम मतदारसंधात 1 लाख 22 हजार 242 मतदार दुबार आढले. नाशिक पूर्व मतदारसंघात 88 हजार 932 आणि नाशिक मध्य मतदारसंघामध्ये 76 हजार 319 मतदार दुबार आढळले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे.
एक नाव वगळणार
मोठ्या औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, उद्योग व बांधकाम क्षेत्र यासारख्या ठिकाणी एकाच छत्राखाली अनेक नागरिक कार्यरत असतात. त्यामुळे अशा आस्थापना चालकांनी आपल्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची मतदार यादीत दुबार नाव नोंदणी झालेली नाही याबाबत खातरजमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारीमांढरे यांनी 142 मोठ्या आस्थापना चालकांना केले होते. त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. शिवाय मतदार यादीमध्ये कोणी जाणीवपूर्वक दुबार नावे सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तिंविरोधात निवडणूक कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंतर 64 हजार 224 मतदारांनी स्वयंघोषणा पत्र सादर केले. त्यात 117 सरकारी अधिकारी, 32 खासगी आणि 7 निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मतदार यादीमध्ये आपले नाव दोनदा असल्याचे म्हटले आहे. आता यांच्याकडून फॉर्म क्रमांक 7 भरून घेऊन त्यांचे एक नाव वगळण्यात येणार आहे.
इतर नावांचे काय?
आतापर्यंत मतदार यादीतून फक्त 12 हजार दुबार नावे वगळण्यात आली आहेत. मग उरलेल्या जवळपास अडीच लाख दुबार मतदारांचे काय होणार, हे अजून गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी शिवसेना आक्रमक आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
इतर बातम्याः
Omicron ची धास्ती! औरंगाबादेत दक्षिण अफ्रिकेसह विदेशातून 46 जण आले, 21 जण निगेटिव्ह