महंगाई डायन खाए जात हैः डोक्याला शॉट; नाशिकमध्ये डिझेल शंभरच्या पुढे!

गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर नाशिककरांच्या डोक्याला आता डिझेलच्या दराने शॉट दिला आहे. डिझेलच्या किमती लिटरमागे चक्क शंभरीच्या पुढे म्हणजे 100 रुपये 27 पैशांवर गेल्याने महागाईचा आगडोंब येणाऱ्या काळात उसळणार आहे.

महंगाई डायन खाए जात हैः डोक्याला शॉट; नाशिकमध्ये डिझेल शंभरच्या पुढे!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 4:25 PM

नाशिकः गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर नाशिककरांच्या डोक्याला आता डिझेलच्या दराने शॉट दिला आहे. डिझेलच्या किमती लिटरमागे चक्क शंभरीच्या पुढे म्हणजे 100 रुपये 27 पैशांवर गेल्याने महागाईचा आगडोंब येणाऱ्या काळात उसळणार आहे.

गेल्या अकरा महिन्यांमध्ये इंधन दरांमध्ये भयंकर अशी वाढ झाली आहे. त्यात पेट्रोलचे दर लिटरमागे जवळपास 22 रुपये 97 पैशांनी महागले आहेत, तर डिझेलचे दर हे 24 रुपये 11 पैशांनी महागले आहेत. नाशिक शहराचा विचार केला, तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेट्रोलची किंमत लिटरमागे 88.21 रुपये होती. ते आता 111.18 रुपयांवर पोहचले आहे. तर डिझेलने पेट्रोलला तगडी टक्कर देत आपली खेळी सुरूच ठेवली असून, त्याचे दरही लिटरमागे चक्क 100 रुपये 27 पैशांवर गेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात याचा सर्व क्षेत्रावर परिणाम होणार आहे. किराणा, कपडे, बांधकाम साहित्यापासून ते आपल्या जीवनाशी निगडित प्रत्येक वस्तू महागणार आहे. कारण सर्व वाहतूक ज्या वाहनांतून होते, त्यांचे इंधन असणाऱ्या डिझेलच्या दरामध्ये आता वाढ झाली आहे. त्यामुळे आता महागाईचा डोंब उसळल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती आत्तापासून नागरिक व्यक्त करत आहेत.

किमती पुन्हा वाढल्या

देशभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल 34 तर डिझेलच्य प्रतिलीटर दरात 37 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीला लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र, पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 110.75 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 101.40 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 114.69 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 104.78 आणि 93.54 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सीएनजी गॅसच्या किमतीत वाढ

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ पीएनजी, सीएनजीच्या किंमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किमतीत 2.28 रुपये प्रति किलोने वाढ जाहीर केली. किमतीत वाढ झाल्यानंतर दिल्लीत सीएनजी गॅसची किंमत वाढून 49.76 प्रति किलो होईल. नोएडामध्ये ही किंमत 56.02 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढेल. गुरुग्राममध्ये ही किंमत 58.20 रुपये किलो, रेवाडी 58.90 रुपये किलो, कैथल 57.10 रुपये किलो, मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली 63.28 रुपये किलो, फतेहपूर आणि हमीरपूर 66.54 रुपये किलो आणि अजमेर, पाली, राजसमंद 65.02 रुपये प्रतिकिलो असेल.

कच्च्या तेलाचे दर उच्चांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

इतर बातम्याः

दसऱ्यानिमित्त विशेष सोय: नाशिकमध्ये आज सुट्टी दिवशीही रजिस्ट्री, वाहन नोंदणी सुरू; ही कार्यालये आहेत उघडी!

Special report: घावली मुळमायेची मुळी, नारोशंकरांनी मागे पाहिले अन् माता गोदापात्रात थांबली; राजेबहाद्दरांच्या देवीची रोमहर्षक आख्यायिका!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.