नाशिकमध्ये 735 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, एकट्या सिन्नरमध्ये 155 बाधित

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार सद्यस्थितीत जिल्ह्यातील 735 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नाशिकमध्ये 735 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, एकट्या सिन्नरमध्ये 155 बाधित
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 3:11 PM

नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 128 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 735 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 674 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 32, बागलाण 7, चांदवड 31, देवळा 8, दिंडोरी 21, इगतपुरी 1, कळवण 10, मालेगाव 6, नांदगाव 9, निफाड 132, सिन्नर 155, त्र्यंबकेश्वर 5, येवला 67 अशा एकूण 484 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 217, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 9 तर जिल्ह्याबाहेरील 25 रुग्ण असून असे एकूण 735 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 437 रुग्ण आढळून आले आहेत.

विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू

नाशिकच्या कॉलेजमध्ये आजपासून 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मंत्री उदय सामंत यांनी तशा सूचना दिल्या आहेत. नाशिकमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. विशेषतः सिन्नर, निफाड आणि येवला हे हॉटस्पॉट झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिक शहरातील महाविद्यालयांमध्ये 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लस घ्यायला लावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने ही तयारी केली आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेतलेले पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही दिलासा मिळणार आहे.

नाशिकमध्ये विक्रमी लसीकरण

एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

मुबलक डोसचा पुरवठा

नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांकडून देण्यात आली.

इतर बातम्याः

विभागीय आयुक्तांच्या चोवीस तास कडेकोट बंदोबस्त असलेल्या बंगल्यात चोरी, नाशिकमधला धक्कादायक प्रकार!

एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; दिवाळीपूर्वी पगार करण्यासह अनेक मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अनुदान वाटपात घोळ; चौकशी समितीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न, ठपका ठेवलेल्या दोषींवर कारवाईस टाळाटाळ

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.