पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांमध्ये मोठी वाढ, चिंता वाढली

पालघरमध्ये कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात तब्बल 1493 बालक कुपोषणाच्या कचाट्यात सापडल्याचे समोर आले आहे. (In Palghar district malnutrition cases increased by 1493 during lockdown)

पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांमध्ये मोठी वाढ, चिंता वाढली
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 7:22 PM

पालघर : जिल्ह्यातील कुपोषित बालकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पालघरमध्ये कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात तब्बल 1493 बालक कुपोषणाच्या कचाट्यात सापडल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, टाळेबंदीच्या काळात ही आकडेवारी समोर आल्याने, पालघर जिल्हा प्रशासन तसेच नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (In Palghar district malnutrition cases increased by 1493 during lockdown)

जिल्ह्यात मागील वर्षी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात 1376 अतितीव्र कुपोषित, तर 12,684 तीव्र कुपोषित बालकांची नोंद  झाली होती. चालू वर्षी याच काळात 1493 अतितीव्र, तर 1,4013 तीव्र कुपोषित बालकांची नव्याने नोंद झाली आहे. म्हणजे अतितीव्र कुपोषित बालकांमध्ये तब्बल 117 आणि तीव्र कुपोषित बालकांमध्ये तब्बल 1329 संख्येने वाढ झाली आहे. एका वर्षात झालेली ही कुपोषणवृद्धी चिंताजनक असल्याचं, आरोग्य विषयक तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

योजना सामान्यांपर्यंत न पोहोचल्याने कुपोषनात वृद्धी

टाळेबंदीत जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात अंगणवाड्या, ग्राम बाल विकास केंद्रे, आरोग्य व्यवस्था आदी सरकारी संस्थांकडून म्हणावं तेवढ्या क्षमतेने काम झालं नसल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढली. तसेच जिल्हा प्रशासनानेही शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात हयगय केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे. तसेच, आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचेही म्हटले जात आहे.  पालघर जिल्ह्यात मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत 100 पेक्षा जास्त अतितीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. तर, एक हजाराहून अधिक बालके तीव्र कुपोषणाने ग्रस्त आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोनानंतर महाराष्ट्रावर नव्या विषाणूजन्य रोगाचं सावट, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा

आधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट

पालघर साधू हत्याकांड : एका अधिकाऱ्यासह 18 पोलिसांवर कारवाई; राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

(In Palghar district malnutrition cases increased by 1493 during lockdown)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.