Ramgiri Maharaj : ज्यांच्या वक्तव्यावरुन वाद झाले, ते रामगिरी महाराज आता साईबाबांबद्दल म्हणाले…

Ramgiri Maharaj : दोन महिन्यांपूर्वी रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद झाला होता. त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी झालेली. त्यावेळी ते म्हणालेले की, 'मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, चूक केली असं वाटत नाही'

Ramgiri Maharaj : ज्यांच्या वक्तव्यावरुन वाद झाले, ते रामगिरी महाराज आता साईबाबांबद्दल म्हणाले...
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 11:04 AM

मागच्या दोन महिन्यांपासून रामगिरी महाराज त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. ऑगस्ट महिन्यात नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावात आयोजित प्रवचनादरम्यान सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी एका विशिष्ट धर्माबद्दल वक्तव्य केलं. त्यावरुन मोठा गदारोळ झाला. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली. “मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, चूक केली असं वाटत नाही. माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही”, असं म्हणत रामगिरी महाराज आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले होते.

आता रामगिरी महाराज कोट्यवधी भक्तांच श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल बोलले आहेत. सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांचे हस्ते आज एकरुखे येथील वज्रेश्वरी देवीची नवरात्रातील पहिली आरती पार पडली. तत्पुर्वी रामगिरी महाराजांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जेसीबीतून पुष्पवर्षा करत ढोल ताशाच्या निनादात शोभा मिरवणूक पार पडली. यावेळी बोलताना रामगिरी महाराजांनी साईबाबांबद्दल मतं मांडली. “साईबाबा संत होते. संताला कुणी देव म्हणून पुजत असेल तर तो भावनेचा प्रश्न आहे” असं रामगिरी महाराज म्हणाले

‘साईबाबा मुस्लिम नव्हते’

“आपण गुरूला देव म्हणून पुजतो. साईबाबांना मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. साईबाबा मुस्लिम नव्हते. साईबाबा रामभक्त होते” असं रामगिरी महाराज म्हणाले. ‘साईबाबा मुस्लिम असते तर त्यांनी शिर्डीत रामजन्मोत्सव का सुरू केला असता?’ असा सवाल रामगिरी महाराजांनी विचारला. “साईबाबांच्या वास्तव्याची जागा मशिदीची जरी असली, तरी त्याला द्वारकामाई म्हंटले जायचे. म्हणजेच साईबाबा भगवान कृष्णाचे देखील भक्त होते. साईबाबा मंदिरात सनातन, वैदिक पद्धतीने पूजापाठ केला जातो. इस्लाम धर्माचा त्याठिकाणी काहीही संबंध येत नाही” असं रामगिरी महाराज म्हणाले.

‘साईबाबांच्या मुर्त्या कढण्यामागे काहीतरी षडयंत्र’

“गंगागिरी महाराजांनी सर्वात आगोदर सर्वांना साईबाबांची ओळख करून दिली. हे बालक शिर्डीचे भाग्य चमकवणार अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. वाराणसीच्या मंदिरातून साईबाबांच्या मुर्त्या कढण्यामागे काहीतरी षडयंत्र आहे. असे कृत्य करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी रामगिरी महाराजांनी केली.

उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.
'मला संपवू नका, मी जिवंत...', अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
'मला संपवू नका, मी जिवंत...', अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?.
मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर अन्...
मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर अन्....
भिडेंचं आक्षेपार्ह वक्तव्य, 'हिंदू महामूर्ख अन् दांडिया हिंदूना...'
भिडेंचं आक्षेपार्ह वक्तव्य, 'हिंदू महामूर्ख अन् दांडिया हिंदूना...'.
हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, भाजपला राम-राम करून 'तुतारी' हाती घेणार
हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, भाजपला राम-राम करून 'तुतारी' हाती घेणार.
सदावर्ते ठाकरेंच्या विरोधात लढणार? बिगबॉसच्या घरातून आव्हान देणार?
सदावर्ते ठाकरेंच्या विरोधात लढणार? बिगबॉसच्या घरातून आव्हान देणार?.
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.