Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bull Cart Race : भिर्रर्रर्रर्र…. पिंपरी-चिंचवडमध्ये बैलगाडा शर्यत विजेत्यांवर बक्षिसांची खैरात! पाहून तुमचेही डोळे फिरतील

चिखली टाळगाव घाटात गेल्या 5 दिवसात तब्बल 1200 गाडे धावल्याचे उघड होत आहे. तर येथे तब्बल तब्बल दीड कोटींची बक्षीसांची खैरात करण्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही बैलगाडा शर्यत भरघोस बक्षिसामुळे चर्चत आली आहे. त्यामध्ये अठ्ठावीस लाखांचा जेसीबी, बारा लाखांची बोलेरो, अकरा लाखांचे तीन ट्रॅक्टर, साडे तीन लाखांच्या दोन बुलेट अन 80 लाखांच्या 114 दुचाकी यांचा समावेश होता.

Bull Cart Race : भिर्रर्रर्रर्र.... पिंपरी-चिंचवडमध्ये बैलगाडा शर्यत विजेत्यांवर बक्षिसांची खैरात! पाहून तुमचेही डोळे फिरतील
बैलगाडा शर्यतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 10:33 PM

पिंपरी चिंचवड : येथील चिखली टाळगावमध्ये भरलेली बैलगाडा शर्यतीला (Bull Cart Race)पुण्यासह अजूबाजूच्या बैलगाडा शर्यत शौकीनांनी हजेरी लावली. तसेच राज्यातील अनेक राजकीय दिग्गजांनी ही आपली उपस्थिती लावत मैदान मारले. या बैलगाडा शर्यतीत राजकीय नेत्यांनी जोरदार राजकीय फटके बाजी केली त्यामुळे ही बैलगाडा शर्यत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी मुळशी पॅटर्न चित्रपटातील बैल कधी एकटा येत नाही तो जोडीनं येतो आणि नांगरासकट येतो हा डायलॉग विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मारत मैदान मारले. त्यामुळे ही बैलगाडा शर्यत होती की राजकीय शर्यत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हाच प्रश्न अनेकांना बक्षिसामुळे (Prize)पडला आहे. चिखली टाळगावमध्ये भरलेली बैलगाडा शर्यत ही भरघोस बक्षिसामुळे चर्चत आली होती. गेल्या 5 दिवसात तब्बल 1200 गाडे हे घाटात धावले आहेत. ज्यात तब्बल दीड कोटींची बक्षीस होती.

चिखली टाळगाव घाटात गेल्या 5 दिवसात तब्बल 1200 गाडे धावल्याचे उघड होत आहे. तर येथे तब्बल तब्बल दीड कोटींची बक्षीसांची खैरात करण्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही बैलगाडा शर्यत भरघोस बक्षिसामुळे चर्चत आली आहे. त्यामध्ये अठ्ठावीस लाखांचा जेसीबी, बारा लाखांची बोलेरो, अकरा लाखांचे तीन ट्रॅक्टर, साडे तीन लाखांच्या दोन बुलेट अन 80 लाखांच्या 114 दुचाकी यांचा समावेश होता. अखेर आज शेवटच्या दिवशी मावळ तालुक्यातील शेतकरी रामनाथ वारींगे यांच्या बैलगाड्याने 11:22 सेकंद मध्ये हा घाट पार करत पहिला क्रमांक मिळवला तर त्याच पहिल्या क्रमांकामध्ये आणखी चार बैलगाडे 11:22 सेकंद च्या खालोखाल आल्याने त्यांना देखील हे बक्षीस विभागुन देण्यात आलं आहे.

महेश लांडगे म्हणाले?

तर महेश लांडगे यांनी सर्व राज्यात जी बैलगाडा शर्यत सुरू झाली ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाल्याचे म्हटले आहे. 2017 पर्यंत कुठल्याच सरकार ने मुख्यमंत्र्यांनी खर्च केला नाही. आम्ही एक एक रुपये गोळा करून केस लढत होतो, पण आमच्याकडे फी एवढे पैसे नव्हते, पेटाकडे मोठे नेते होते. मात्र आम्ही हार नाही मानली, या बैलगाडा शर्यतीसाठी जी कायदेशीर लढाई होती त्याचा खर्च देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केला. आधी सुप्रीम कोर्टा बाहेर उपाशी थांबलो, पण कुणी मदत केली नाही, असेही ते म्हणाले, तसेच बोलताना जर कुणाच्या मनाला लागले असलं तर माफी मागतो, असे म्हणत त्यांनी उपस्थितांची माफीही मागितली.

हे सुद्धा वाचा

परराज्यातूनही शर्यतीला प्रतिसाद

लक्षवेधी बक्षीसांची मेजवानी असल्यामुळे शर्यतीला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू याठिकाणाहून बैलगाडा मालकांनी यात भाग घेतला होता. तर महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, जालना, नाशिक, सिन्नर यासह पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी नोंदणी केली होती. त्यामुळे देशभरातून बैलगाडा सहभगी होणारी ही राज्यातील आणि देशातील पहिली बैलगाडा शर्यत होईल, असा दावा करण्यात आला.

बक्षीस वितरण खालील प्रमाणे

प्रथम क्रमांक JCB

  1. रामनाथ विष्णू वारिंगे-11:22 सेकंद
  2. राजू शेठ जवळेकर-11:24
  3. संतोष ज्ञानेश्वर मांडेकर-11:31
  4. बाबुराव बाबाजी वाईकर-11:36
  5. अजिंक्य खांडेभराड-11:37

द्वितीय क्रमांक-बोलेरो कार

  1. सुनिल अण्णा शेळके मावळ आमदार 11:40
  2. भैरवनाथ मित्र मंडळ करंजविहीरे-11:56
  3. पांडुरंग किसन काळे-11:56

तृतीय क्रमांक ट्रॅक्टर

    1. भालेराव साहेब कदम-11:66
    2. रामशेठ बाबुराव थोरात मयूर हॉटेल-11:56

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....