Maharashtra Water Crisis : : वरुणराजाच्या कृपादृष्टीनंतरही पाणीसाठा 62 टक्क्यांवर, राज्यात 34 टॅंकरने पाणीपुरवठा

गत हंगामात परतीच्या पावसाने अशी काय हजेरी लावली होती की, आता पाणी संकट ओढावणारच नाही असे चित्र निर्माण झाले होते. राज्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला होता. मात्र, मुबलक प्रमाणात पाणी असल्यावर त्याचे महत्व कुणाला? मध्यंतरी पाण्याचा अतिवापर आणि आता वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी खलावत आहे. एवढेच नाही तरा मराठावड्यातील पाण्यासाठी औरंगाबादमध्ये लोकांनी टॉयलेट पेपर गळ्यात घालून आंदोलन केले तर अमरावती जिल्ह्यातील 47 प्रकल्पामध्ये 51 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Maharashtra Water Crisis : : वरुणराजाच्या कृपादृष्टीनंतरही पाणीसाठा 62 टक्क्यांवर, राज्यात 34 टॅंकरने पाणीपुरवठा
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 11:35 AM

मुंबई : गत हंगामात परतीच्या पावसाने अशी काय हजेरी लावली होती की, आता पाणी संकट ओढावणारच नाही असे चित्र निर्माण झाले होते. (Maharashtra) राज्यात सरासरीपेक्षा अधिकचा (Heavy Rain) पाऊस झाला होता. मात्र, मुबलक प्रमाणात पाणी असल्यावर त्याचे महत्व कुणाला? मध्यंतरी (Use Water) पाण्याचा अतिवापर आणि आता वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी खलावत आहे. एवढेच नाही तरा मराठावड्यातील पाण्यासाठी औरंगाबादमध्ये लोकांनी टॉयलेट पेपर गळ्यात घालून आंदोलन केले तर अमरावती जिल्ह्यातील 47 प्रकल्पामध्ये 51 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा जास्तीचा आहे पण झालेल्या पावसाच्या तुलनेत नक्कीच तो कमी आहे. राज्यातील एकूण 3 हजार 276 प्रकल्पामध्ये सुमारे 893.20 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. सरासरीच्या तुलनेत 62 टक्के पाणीसाठा आहे तर गतवर्षीपेक्षा 13 टक्क्यांनी तो अधिकही आहे.

पाण्याचा अतिवापर अन् बाष्पीभवन

पाण्याचे महत्व नसल्यावरच कळते. शिवाय दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन करुनही नागरिकांच्या मानसिकतेमध्ये बदल होत नाही. यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे त्याचा वापरही वाढला. भविष्याची चिंता न करता नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठीही वापर झाला आहे. हे कमी म्हणून की काय.. गेल्या महिन्याभरापासून उन्हाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात झाले आहे. यंदा तीव्र पाणीटंचाई भासणार नसली तरी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही काय स्थिती आहे याचा गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे.

अशी आहे प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती

राज्यात लहान, मध्यम आणि मोठे असे मिळून 3 हजार 267 प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांची संख्या ही 141 असून यामध्ये 661.02 टीएमसी पाणीसाठा आहे तर मध्यम प्रकल्पांची संख्या ही 258 असून यामध्ये 120.15 टीएमसी पाणीसाठा आहे. तर लघू प्रकल्पांची संख्या जास्त आहे. राज्यात 2 हजार 868 लघू प्रकल्प असून यामध्ये 893.20 टीएमसी पाणी आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाई भासणार नाही पण घटलेली पाणीपातळी विचार करायला लावणारी आहे.

औरंगाबाद विभागात सर्वाधिक पाणीटंचाई, असा आहे विभागनिहाय पाणीसाठा

सर्वात अगोदर पाणीटंचाईच्या झळा ह्या मराठवाड्यालाच सहन कराव्या लागतात. यामध्ये औरंगाबाद विभाग आघाडीवर आहे. औरंगाबाद विभागातील प्रकल्पामध्ये 170.42 टीएमसी पाणीसाठा आहे. अमरावती विभागामध्ये 84.19 टीएमसी, नागपूर विभागामध्ये 75.14 टीएमसी, नाशिक विभागात 121.09 टीएमसी, पुणे विभागात 369.47 एवढा पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा अधिकचा पाणीसाठा हीच दिलासादायक बाब आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural Scheme : कृषी विभागाने मुद्द्याला हात घातला, योजनांच्या अंमलबजावणीसाठी नवा पर्यायच निवडला..!

Mango : यंदा आंब्याचा गोडवा दुरापस्तच, वातारवणातील बदलामुळे आंबा उत्पादनाची स्थिती काय?

Market Committee: शेतीमाल तारण योजनेने शेतकऱ्यांना ‘तारले’, राज्यात 52 कोटींचे कर्ज

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.