फडतूस गृहमंत्री महाराष्ट्राला लाभला, उद्धव ठाकरे सरकारवर कडाडले
ठाणे : गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक असा शब्द वापरला असे मी ऐकले आणि त्याची प्रचिती काल आपल्याला आली आहे. या ठाण्याची ओळख जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचे रक्षण करणाऱ्या शिवसेनेचे ठाणे, धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे, सुशिक्षित, सुसंस्कृत ठाणे अशी ओळख आहे. ती ओळख पुसून गुंडांचे ठाणे असे करण्याचा एक प्रयत्न सुरू […]
ठाणे : गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक असा शब्द वापरला असे मी ऐकले आणि त्याची प्रचिती काल आपल्याला आली आहे. या ठाण्याची ओळख जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचे रक्षण करणाऱ्या शिवसेनेचे ठाणे, धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे, सुशिक्षित, सुसंस्कृत ठाणे अशी ओळख आहे. ती ओळख पुसून गुंडांचे ठाणे असे करण्याचा एक प्रयत्न सुरू झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी ठाणे येथील पत्रकार परिषदेत केली.
आजपर्यंत गॅंग हा शब्द आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण आता महिलांची गॅंग बनायला लागली आहे. महिला गुंडगिरी करायला लागल्या तर मग आपल्या देशाचा राज्याचा ठाण्याचे काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनामधला प्रश्न आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं आता म्हटलं तर या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून त्या महाराष्ट्रातून उकडून फेकून देऊ शकतो.
जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर हे गुंड आणि तोतया शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचत आहेत त्याला हातामध्ये भगवा आणि बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हटल्यानंतर महिला गुंडाकडून हल्ले करणारे हे नपुसंकच म्हणायला पाहिजे.
पोलीस आयुक्तालयात गेलो तर आयुक्तच नाहीत. अजून एक कोणती तक्रार त्या रोजी पत्र दिलेले आहे. त्याच्यामध्ये ज्या गुंड महिलांनी हल्ला केलेला आहे अशा महिला या आपल्या संस्कृतीत बसणार नाहीये. कोणी कोणी हल्ले केले त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड झालेले आहे.
आणखीन एक गंभीर बाब म्हणजे ही रोशनी उपचार घेत होती. मातृत्वासाठी उपचार घेत होती. ती हात जोडून त्यांना सांगत होती की पोटात काय मारू नका. लांबून बोला मावशी, लांबून बोला तरीसुद्धा तिला पोटामध्ये लाथा मारण्यात आल्या.
हे अत्यंत निर्घृण काम करणारी माणसं ही ठाण्यात काय महाराष्ट्र मध्ये राहायच्या लायकीची नाहीत. आयुक्त तर मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं तर सरकारचा एक घटक म्हणून त्याच्याप्रमाणे आयुक्त वागतात की काय याची मला कल्पना नाही. पण, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे.