मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मागे ईडी, सीबीआयचं, आयकर विभागाचं शुक्लकाष्ट सुरुच आहे. आज सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निकवर्तीयांवर आज आयकर विभागानं छापेमारी केलीय. या मंत्र्यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या 4 बांधकाम व्यावसायिकांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. आज दिवसभर जवळपास 40 ठिकाणी आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. (Income tax department Raid on 4 builders close to ministers in Mahavikas Aghadi government)
बांधकाम व्यावसायिक असलेल्या जयंत शाह, प्रशांत निलावार, गिरीश पवार आणि किर्ती कावेडीया यांच्यावर ईडीने छापे टाकले आहेत. गिरीश पवार यांच्या बायकोला 4 तासांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर गिरीश पवार आणि त्यांच्या पत्नीला आयटी ऑफिसला घेऊन जाण्यात आलं आहे. नरिमन पॉईंटमधील अंबेसी सेंटरमध्ये गिरीश पवार यांचं घर आणि कार्यालय आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदवरही आयकर विभागानं धाड टाकली होती. सोनू सूदवर झालेल्या आयकर विभागाच्या छाप्यामुळे अभिनेता काही दिवस त्याच्या घराबाहेर दिसला नाही. दरम्यान, बातमी आली की, आयकर विभागाला सोनू सूदच्या खात्यातून 20 कोटी रुपयांच्या कर चोरीचे संकेत मिळाले आहेत. मात्र, सोनू सूदने हे अहवाल सरळ फेटाळले आहेत.
एचटीला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने 20 कोटी रुपयांच्या कर चोरीबद्दल बोलताना सांगितले की, हे आरोप निराधार आहेत आणि मी देशाचे कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मात्र, आयकर विभागाची चौकशी अद्याप सुरू असल्याने सोनू सूदने या विषयावर अधिक काही सांगण्यास नकार दिला. सोनू सूदने निश्चितपणे सांगितले की, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने दिली आहेत आणि त्याने अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली कागदपत्रेही दिली आहेत.
प्राप्तिकर विभागाने सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा याची मोडस ऑपरेंडी स्पष्ट केली आहे. सोनू सूद हा बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेतल्याचे दाखवून बेहिशेबी पैसे आपल्या बँक खात्यात वळते करायचा. आयकर विभागाने सोनू सूदच्या घरी आणि संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये यासंबंधीची कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदने तब्बल 20 कोटी रुपयांची कर बुडवेगिरी केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.
सोनू सूदने परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडीदरम्यान काही कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदला मोठ्याप्रमाणावर परकीय चलनाच्या स्वरुपात देणगी मिळाली होती. हे पैसे त्याने खर्च केल्याचा संशय प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
इतर बातम्या :
तुमचं लक्ष कुठे आहे?, महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Income tax department raids Raid on 4 builders close to ministers in Mahavikas Aghadi government