income tax raids : राज्यात आयकराची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, रक्कम ऐकून बसेल धक्का

income tax raids : राज्यात आयकर विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरात चाललेल्या या कारवाईत हजारो कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड झाले आहे. यानंतर आता यामध्ये गुंतवणूक करणारे लोकही आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत.

income tax raids : राज्यात आयकराची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, रक्कम ऐकून बसेल धक्का
income tax raid
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 10:23 AM

नाशिक, चंदन पुजाधिकारी : नाशिक शहरात आयकर विभागाच्या २००हून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली आहे. २० एप्रिलला पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुरु झालेली कारवाई २५ एप्रिलपर्यंत चालली. नाशिकमध्ये एकूण पंधरा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांना रडारवर होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील अधिकाऱ्यांचे पथकाने तब्बल सहा दिवस ही कारवाई केली. राज्यातील आयकर विभागाने केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई होती. यामुळे कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी रक्कम उघड झालीय.

कशी झाली कारवाई

नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई, नागपूर कार्यालयातील २२० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक कारवाई करत होतं. या पथकाने बांधकाम व्यावसायिकांची ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊस ठिकाणी छापे टाकले.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

सलग 6 दिवस ही कारवाई सुरु होती. नाशिकमध्ये राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई झाली. त्यात मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता उघड झाली आहे. राज्यातील बडे अधिकारी, व्यापारी आणि राजकीय नेते यांची यामध्ये गुंतवणूक आहे. जवळपास दीड हजार अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी केली संबंधित बिल्डरांकडे गुंतवणूक केली आहे. आयकर विभागाच्या छाप्यात बिल्डर्सचे 3333 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड झाले आहे.

आता ती लोक रडारवर

गेली सहा दिवस बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, निवासस्थाने आणि इतर ठिकाणी झाडाझडती करण्यात येत होती. त्याची नाशिक शहरात मोठी चर्चा होती. या चौकशीत आता काय समोर येते याची उत्सुक्तता नागरिकांना होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा दिवसांत तब्बल 3333 कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघड केल्यानंतर आता दुसरा टप्पा सुरु होणार आहे. यामध्ये ज्या लोकांना बांधकाम व्यावसायिकांकडे गुंतवणूक केली, ते रडारवर असल्याची सांगितले जात आहे.

नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर, घरावर छापा टाकल्याने खळबळ उडाली होती. कर चुकवेगिरी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे यामुळे चांगलेच दणाणले होते. त्यात तब्बल सहा दिवस चौकशी झाल्याने चौकशी नेमकं काय आढळून आलं ? यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.