एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; दिवाळीपूर्वी पगार करण्यासह अनेक मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज बुधवारपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. नाशिक, मनमाड, पुणे, नागपूर, सोलापूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; दिवाळीपूर्वी पगार करण्यासह अनेक मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार
नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत राज्यव्यापी बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला.
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 1:26 PM

नाशिकः राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज बुधवारपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. नाशिक, मनमाड, पुणे, नागपूर, सोलापूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आंदोलन तीव्र झाल्यास दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेणार का, हे पाहावे लागेल.

नाशिक, मनमाडमध्ये तीव्र पडसाद

नाशिकमधील विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे. नाशिकच्या एन. डी. पटेल रोडवरील एस. टी. डेपोत या कर्मचाऱ्यांनी एकत्र जमले होते. त्यांनी महागाई भत्ता देण्यात यावा, वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी. दिवाळीपूर्वी वेतन मिळावे अशी मागणी यावेळी केली. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संप करू, असा इशारा इंटकचे नेते जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. दरम्यान, मनमाडमध्येही कामगारांनी बंद पुकारून उपोषण केले. आंदोलनामुळे स्थानकावरून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

पुणे, कोल्हापूरमध्येही आंदोलन

पुणे आणि कोल्हापूरमध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. पुण्यात स्वारगेट परिसरातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर संयुक्त कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूरमध्येही एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संप पुकारू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नागपूर, सोलापूरमध्ये उपोषण सुरू

नागपूरमध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या काळात एसटी वाहतूक सुरू राहील. प्रवाशांना वेठीस धरणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. सोलापूरमध्ये श्रमिक कृती संघटनेने उपोषण सुरू केले आहे. मात्र, या ठिकाणीही एसटीची वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे. आंदोलनात सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई करू, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

तीन टप्प्यात आंदोलन

समितीच्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे तीन टप्प्यात आंदोलन करण्याच निश्चित करण्यात आले आहे. दिवाळी तोंडावर 27 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू करण्यात आले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी अंतिम लढाईची तयारी एसटी कर्मचाऱ्यांनी केल्याचे एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

आंदोलकांच्या या आहेत मागण्या

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे. या आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाही तर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. दररोज सुमारे 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेळेववर वेतन दिले जात नाही. कोरोना काळात एसटीच्या 306 कर्मचाऱ्यांनी प्राणाची आहुती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना एच. आर. वेळेवर मिळत नाही, डीए वेळेवर मिळत नाही. राज्यातील प्रत्येक संकटाच्या वेळी एसटी कर्मचारी पुढे असतो. तरीही त्याच्यावर अन्याय होतो म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अनुदान वाटपात घोळ; चौकशी समितीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न, ठपका ठेवलेल्या दोषींवर कारवाईस टाळाटाळ

गोदावरी, गंगापूर कालव्यातील पाणी वापरासाठी मागवले अर्ज; नाशिक पाटबंधारे विभागाची 10 नोव्हेंबर पर्यंतची मुदत

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाला चार आठवड्यांचा दिलासा, अटक टाळण्यासाठी धडपड

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.