उद्धव साहेब, तुम्ही पक्ष घेऊन चालले कुठे…अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा हल्ला

माझी तयारी आधीपासूनच आहे. 2019 मध्ये मी अपक्ष आमदार झालो. तेव्हापासून मी कार्यकर्त्यांना सांभाळतच आहे. प्रत्येकाने आपापले काम करायला पाहिजे. शेवटी कार्यकर्त्याच्या भावना आणि राजकीय परिस्थिती याच्यावर वरिष्ठ निर्णय घेत असतात, हे मला मान्य आहे.

उद्धव साहेब, तुम्ही पक्ष घेऊन चालले कुठे...अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा हल्ला
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 5:02 PM

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांमुळे आम्ही शिवसेनेत गेलो. तेव्हा फक्त आणि फक्त शिवसेनेला आम्ही पाठिंबा दिला. परंतु चिरंजीव उद्धव ठाकरे हे आता पक्षनेते आहेत. त्यांच्या पक्षातील जिल्हाप्रमुख प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा विरोध करत आहेत. त्याचे निवदन देत आहेत. पत्रकार परिषद घेत आहेत. मला हेच आश्चर्य वाटते आहे की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडले का? ज्या प्रभू श्रीरामाचा तुम्ही विरोध करत आहात, तुमचा जिल्हाप्रमुख विरोध करत आहेत, तुम्ही पक्ष घेऊन चालले कुठे.? तुम्ही कितीही मोठ मोठी भाषणे करा. परंतु आता तुमचे विचार स्पष्ट दिसले आहे. तुम्हाला दाखवायचे वेगळे आणि करायचे वेगळा हे आता जनतेसमोर आले आहे. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. भंडाऱ्यातील प्रभू श्रीरामांच्या नवनिर्माणाधिन मूर्तीला शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी आक्षेप घेतला. त्यावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला.

भंडाऱ्यात महायुतीने कोणाला तिकीट दिले तर त्यावर बोलताना संजय रेहपाडे म्हणाले, प्रत्येकाला जागा मागण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ नेत्यांना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जागा मागितली नाही. त्यांनीच मला सांगितले आहे की, तुम्ही परिवाराचे आहात, तुम्ही सोबत रहा. आम्ही तुम्हाला स्टेज देऊ. परंतु त्यांनी जर परिस्थिती पाहून एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट दिले तरी माझा त्याला विरोध नाही. मी जसा आहे तसा आहेच.

माझी तयारी आधीपासूनच आहे. 2019 मध्ये मी अपक्ष आमदार झालो. तेव्हापासून मी कार्यकर्त्यांना सांभाळतच आहे. प्रत्येकाने आपापले काम करायला पाहिजे. शेवटी कार्यकर्त्याच्या भावना आणि राजकीय परिस्थिती याच्यावर वरिष्ठ निर्णय घेत असतात, हे मला मान्य आहे.

हे सुद्धा वाचा

आपण महायुतीसोबतच राहणार

बच्चू कडू महायुतीसोबत नाही, हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु मी तरी आजही शिंदे साहेबांसोबत आहे. फडणवीस साहेबांसोबत आहे. त्याच्यामुळे मी युती सोबत आहे. आमदार बच्चू कडू यांच्याप्रमाणे आमदार नरेंद्र भोंडेकर ही नाराज असल्याची चर्चा असल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.