कोकणात होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठ, मुख्यमंत्र्यांनी दिली गुडन्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येणार आहे.

कोकणात होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठ, मुख्यमंत्र्यांनी दिली गुडन्यूज
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 5:08 PM

First Maritime University In Konkan : देशातील पहिलं सागरी विद्यापीठाची लवकरच स्थापना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय स्थापन केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय स्थापन केले जाणार असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे, अशी मागणी केली जात होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठीच्या या दोन्ही मागण्यांना मंजुरी दिली आहे.

या सागरी महाविद्यालयाला 500 ते 600 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर विधी महाविद्यालयाला २५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यालाही तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता समुद्रावर अभ्यास संशोधन करणाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 50 एकर जागा देण्यास तयार असल्याचे पत्रही उदय सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात कोकण दौऱ्यादरम्यान याबद्दलची घोषणा केली होती. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे करणे प्रस्तावित आहेत. या विकासाअंतर्गत विविध योजनांसह रत्नागिरी येथे देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरु करणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या मेळाव्यात त्यांनी याबद्दल भाष्य केले होते.

अखेर आता एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठीच्या या दोन्ही मागण्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येणार आहे. ज्यात समुद्र विज्ञानापासून समुद्राचा इतिहास, नियम, संशोधन इत्यादी विषयांचा अभ्यास करता येणार आहे.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.