लोणावळ्यातील बोगद्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, कसा असेल जगातला सर्वात रुंद बोगदा
संपूर्ण घाट सेक्शन सेफ्टी नेटनं सेफ केला. अपघात होण्याचं प्रमाण बंद झालं.
सुमेध साळवे, प्रतिनिधी, लोणावळा : महाराष्ट्रात पहिल्यांदा तलावाच्या खाली बोगदा तयार करण्यात आला. याची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दरड कोसळली होती. तेव्हा हा प्रकल्प एकनाथ शिंदे यांनी हाती घेतला होता. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दरड कोसळली तेव्ही मी स्वतः आलो होतो. आता बोगद्याचा पहिला टप्पा सुरू झालाय. याची पाहणी करण्यासाठी आलो आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण घाट सेक्शन सेफ्टी नेटनं सेफ केला. अपघात होण्याचं प्रमाण बंद झालं. त्याचवेळी हा बोगदा देशातलाचं नाही तर जगातला सर्वात रुंद असणारा आहे. वर लोणावळा सरोवर आहे. खाणी बोगदा तयार करण्यात येतोय. आठ किलोमीटरचा हा बोगदा आहे. त्यामुळं मुंबई-पुणे प्रवास अर्ध्या तासानं कमी होईल.
घाट सेक्शनमधील ट्रॅफिक कमी होईल. अपघात कमी होतील. प्रदूषण कमी होईल. वेळ आणि इंधनही वाचेल. असा हा फायद्याचा प्रकल्प राज्याला देत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
सुरक्षेची पूर्ण काळजी यामध्ये घेतली आहे. सुरक्षा केली असल्यानं दरड कोसळणार नाही. तरीही समजा दुर्घटना घडली तर तीनशे मीटरवर एक्झिट ठेवलेले आहेत. आग लागल्यास वॉटर मशिन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
सुरक्षेची काळजी घेतली आहे. टोल आकारण्याचा विषय नाही. मोठ-मोठे प्रकल्प आपण राज्याला बहाल करतोय. अतिक्रमण केल्यास कारवाई होत असते, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.