Aryan Khan drugs case | समीर वानखेडे यांना आर्यन खानप्रकरणातून हटवलं, आता तपास थेट एनसीबीच्या दिल्ली टीमकडे
Sameer Wankhede |क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. आर्यन खान केस तसेच इतर चार केसेस वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आलाय.
मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. आर्यन खान केससह सहा केसेस वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत. या सर्व केकेसचा तपास एनसीबीची दिल्ली टीम करणार आहे. तशी माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी मुथा अशोक जैन (Mutha Ashok Jain) यांनी दिलीय.
Mumbai | Total 6 cases of our zone will now be investigated by Delhi teams (of NCB), including Aryan Khan’s case and 5 other cases. It was an administrative decision: Mutha Ashok Jain, Deputy DG, South-Western Region, NCB
(File photo) pic.twitter.com/vmjP65YOOv
— ANI (@ANI) November 5, 2021
क्रूझ ड्रग्ज पार्टी कारवाईवर संशय, अन्य अनेक आरोप
क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
संजय सिंग करणार तपास
दरम्यान, आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्यापासूनच संजय सिंग या प्रकरणाची तपास करणार येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले.
तपासाआधीच सहा प्रकरणांची चौकशी काढून घेतली
अनेक आरोप झाल्यानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीने खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी एसआयटीची स्थापनाही केली आहे. तसेच वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राचा अहवाल अजून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिलेला नाही. मात्र, या सर्व गोष्टी अर्धवट असतानाच समीर वानखेडें यांच्याकडून एकूण सहा केसेसचा तपास काढून घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
इतर बातम्या :
राज्यात सत्ता कशी मिळवायची? अर्जुन खोतकरांनी सांगितलं सोप्पं गणित; आघाडी फॉर्म्युला स्वीकारणार?
बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र…बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर कारवाई होणार ?
हायब्रिड वारफेअरच्या मुद्द्यावर मोदींची चिंता; चीनकडून असलेल्या धोक्याबाबत जवानांना केले सतर्क
(investigation of Aryan Khan arrest drugs case has been withdrawn from Sameer Wavkhede)