Rashmi Shukla | पोलीस महासंचालक कोण? मुनगंटीवारांकडून रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाच टि्वट डिलीट
Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार? या बद्दल अजून निश्चिती नाहीय. रश्मी शुक्ला यांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे. आधी सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं. नंतर ते टि्वट डिलीट केलं.
मुंबई (कृष्णा सोनारवाडकर) : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होऊ शकते. त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनतील असं बोलल जातय. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टि्वट करुन रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचलाकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच अभिनंदन केल होतं. पण नंतर काहीवेळाने त्यांनी ते टि्वट डिलीट केलं. नवे पोलीस महांसचालक कोण याची अजूनही निश्चिती नाही. येणारी पुढची ऑर्डर रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीची असू शकते. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याची सरकारकडून अजून अधिकृत ऑर्डर आलेली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला चर्चेत आल्या होत्या. सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची MPSC अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला याच पुढच्या राज्याच्या पोलीस महासंचालक असतील अशी चर्चा रंगली आहे.
सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची MPSC अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या टि्वटमुळे रश्मी शुक्ला याच पुढच्या राज्याच्या पोलीस महासंचालक असतील अशी चर्चा रंगली आहे. रश्मी शुक्ला पुन्हा एकदा महाराष्ट्रात दमदार कमबॅक करु शकतात. मागच्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरु आहे. सध्या त्या सीआरपीएफ नियुक्तीवर आहेत. मविआ सरकारमधील नेत्यांच्या फोन टॅपिंगमुळे त्यांचं नाव चर्चेत होतं. रश्मी शुक्ला 1988 साली पोलीस दलात रुजू झाल्या. धडाडीच्या महिला अधिकारी अशी रश्मी शुक्ला यांची ओळख आहे. पुण्यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम सुरु केले होते. रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तचर खात्याच्या प्रमुख होत्या. राज्याच्या सुरक्षेबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच विश्लेषण करण्याची जबाबदारी या खात्यावर असते. मविआ सरकारच्या काळात त्यांना पदावरुन हटवलं.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांना गुप्तचर खात्याच्या प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं व त्यांची दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती केली. आता त्या सीआरपीएफमध्ये एडीजी पदावर कार्यरत आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग हैदराबादमध्ये आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील फोन टॅपिंगची दोन प्रकरण फेटाळून लावली.