VIDEO | गाव नाही राहिलं, घरं नाही राहिली…कुटुंबियांच्या शोधात माणसं तिथेच! दुर्घटनास्थळी टाहो

लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि संपूर्ण माहिती मिळावी म्हणून प्रशासनाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. 

VIDEO | गाव नाही राहिलं, घरं नाही राहिली...कुटुंबियांच्या शोधात माणसं तिथेच! दुर्घटनास्थळी टाहो
Irshalwadi raigad landslide Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 11:09 AM

खालापूर | 20 जुलै 2023 : इर्शाळगडाजवळ डोंगराजवळील एका गावावर काल रात्री दरड कोसळली. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली आहेत. चौक गावापासून 6 किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं.

लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि संपूर्ण माहिती मिळावी म्हणून प्रशासनाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. 

बघुयात इर्शाळवाडीची काही दृश्ये…

घटनेची माहिती मिळताच NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. मात्र इर्शाळगड हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे.

या गावात जाण्यासाठी केवळ पायवाट आहे. त्यामुळे तिथे यंत्रणा पोहोचण्यास अडचणी येत आहेत. जेसीबी. पोकलेन यासारखी वाहणं तिथं पोहचू शकत नाहीयेत. त्यामुळे कुदळ, फावड्याच्या सहाय्याने NDRF कडून बचावकार्य केलं जात आहे. स्थानिकही या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.

दरम्यान इर्शाळगडावरील काही हृदयद्रावक दृश्य समोर येतायत. कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाचे वडील या घटनेत जखमी झालेत. काहींचा शोध लागत नाहीये तर काही दगावलेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकं आणि नातेवाईक इथे जमा झालेत. नातेवाईकांनी इथे अक्षरशः टाहो फोडलाय.

लोकं इथे मदतकार्यासाठी पायवाटेने जात आहेत. बरीच घटनास्थळी थांबून आपला माणूस सापडतोय का याची वाट बघत आहेत.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.