“मैं स्वयं उसको मार डालूंगा”, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज संतापले

jitendra awhad | जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. विविध राजकीय पक्षांबरोबर देशभरातील संत महात्मे आक्रमक झाले आहेत. जगद्गुरु श्री श्री 1008 जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी त्यांना ठार मारण्याचे वक्तव्य केले आहे.

मैं स्वयं उसको मार डालूंगा, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज संतापले
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 12:58 PM

मुंबई, दि. 4 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. संत महात्मांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अयोध्या येथील जगद्गुरु श्री श्री 1008 जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आपण स्वंय जितेंद्र आव्हाड यांचा वध करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरु आहे.

काय म्हणाले जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज

राज सरकार आणि केंद्र सरकार मिळून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी. सरकार कारवाई करणार नसेल तर “मैं स्वयं उसको मार डालूंगा, हमे चाहे फासी होने दो, संत समाज डरता नही है, इस तरह से अकबर के भक्तो को खुश करने की कोशिश की जा रही है,” असे त्यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांना संत समाज माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आव्हाड यांना चपलांचा हार घाला- महंत राजुदासजी महाराज

हनुमान गढीचे महंत राजुदासजी महाराज यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जितेंद्र आव्हाड हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. त्यांना चप्पलाच हार घालून पक्षातून हाकलून द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. जितेंद्र आव्हड जिथे जातील तिथे हिंदू त्यांना चपलाचा हार घालतील. उद्धव ठाकरे यांनी रामद्रोही असणाऱ्या या पक्षासोबत सरकार बनवले. त्यांनी महापाप केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं नाव, चिन्ह, फंड त्यांच्याकडून गेले. आता ते विरोधी पक्षाच्या क्षमतेचे राहिले नाहीत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मानसिकता काही कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांपासून फारकत घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार

नाशिकमध्ये महंत सुधीरदास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी केली आहे. तसेच देशात इशनिंदा कायदा करावा, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्यावेळी आम्ही ही मागणी करणार आहोत. जितेंद्र आव्हाड यांनी काल नशा केली होती का ? त्यांचे 100 अपराध भरले आहे, असे त्यांनी म्हटले.

पुणे शहरात आंदोलन

पुणे शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रभू रामचंद्रांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. अलका चौकात आंदोलन करुन त्यांची तिरडी काढली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.