जळगावात भाजपच्याच आमदार-खासदारामध्ये ‘त्या’ जागेवरुन मतभेद, उन्मेश पाटील यांचा थेट माजी मंत्र्यांना फोन

आमदार मंगेश चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेऊन संबंधित जागेबाबत सुरु असलेल्या वादावर भूमिका मांडली होती. त्यानंतर खासदार उन्मेश पाटील यांचा एक ऑडिओ क्लिप समोर आलाय.

जळगावात भाजपच्याच आमदार-खासदारामध्ये 'त्या' जागेवरुन मतभेद, उन्मेश पाटील यांचा थेट माजी मंत्र्यांना फोन
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 7:21 PM

खेमचंद कुमावत, टीव्ही 9 मराठी, जळगाव : चाळीसगावातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांना फोन करुन जाब विचारला आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांच्याशी संवाद साधलेले ऑडिओ क्लिप खासदारांच्या अधिकृत सोशल अकाउंटवरून व्हायरल करण्यात आलं आहे. कारण नसताना आमदार मंगेश चव्हाण मला प्रकरणात इन्व्हॉल करताय, असा आरोप भाजप खासदारांनी केलाय.

“आमदार मंगेश चव्हाण यांनी मी आणि ते सोबत येऊन तुमच्याशी व्यवहार केला, असा व्हिडिओ तुमच्याकडून तयार केला आहे. मी आणि मंगेश चव्हाण आपल्याकडे व्यवहारासाठी एकत्र कधीही आलो नाही. असा आपण लवकरात लवकर खुलासा करा, अन्यथा मी पत्रकार परिषद घेईल”, असा इशारा खासदार उन्मेश पाटील यांनी फोनवरुन सुरेश जैन यांना दिलाय.

हे सुद्धा वाचा

आमदार मंगेश चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेऊन संबंधित जागेबाबत सुरु असलेल्या वादावर भूमिका मांडली होती. त्यानंतर खासदार उन्मेश पाटील यांचा एक ऑडिओ क्लिप समोर आलाय.

मंगेश चव्हाण पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले होते?

“सुरेश दादा जैन आणि मी जी जागा विकत घेऊन राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेली आहे त्यावरुन काही लोकं डोळ्यावर थोडं पिवळंपण आल्यासारखं, कावीळ झाल्यासारखं वागत धादांत चुकीचे आरोप करत आहेत, सुप्रीम इंडस्ट्रीजचा मालक कोण ते जाहीर करा, असं आव्हान देत होते. त्यांना उत्तर देण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतोय”, असं मंगेश चव्हाण म्हणाले होते.

“सुप्रीम इंडस्ट्रीजचा सर्वस्वी आमदार मंगेश चव्हाण आहे. माझ्या परिवारातील तिथे सर्व भागिदारी आहेत. व्यवसाय, व्यापार करणं गुन्हा नाही. मी आमदार होण्याआधीच तो व्यवसाय आहे. ती जमीन बळकवलेली नाही. जमीन मालकाकडून ती जमीन आम्ही विकत घेतलेली आहे. मी त्यावेळेस आमदार नसताना जमीन घेतली याचे सर्व कागदपत्रे आहेत”, असं मंगेश चव्हाण म्हणाले.

“आमदार झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीतून मी आणि सुरेश ददा जैन संस्थेसाठी जागा दिली. शाळा भरायला जागा नव्हती. कुणीही काहीही बोलत आहेत. जागा भाड्याची होती. दहा वर्षांनी देखील संस्था स्वत:ची जागा घेऊ शकली नाही. व्यावसायिक म्हणून मी ती जागा आमदार नसताना घेतली”, असं चव्हाण म्हणाले.

“जागा सुरेश दादा जैन यांच्या वडिलांची होती. जागामालक कधीही अशाप्रकारे देऊ शकत नव्हते. आपण कुणाला भाड्याने जागा दिली तर आपण तरी एवढी मोठी जागा आणि बांधकाम करु देऊ का? हा प्रश्न आधी त्यांनी स्वत:ला विचारावा. या जागेबाबत जो व्यवहार झालाय त्याबाबत न्यायालयात जावं”, असं चव्हाण म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.