AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Child Death : बाथरुमध्ये हिटरचा शॉक लागून मुलाचा मृत्यू, जळगावमधील धक्कादायक घटना

मुकुंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचा विवाह आहे. या विवाहाची जोरदार तयारी घरी सुरु आहे. यासाठीच मुकुंदा पाटील आणि त्यांची पत्नी दीपाली पाटील हे दोघे डिगंबर पाटील यांच्या घरी गेले होते. यावेळी प्रणव घरी एकटाच होता. दुपारच्या सुमारास प्रणव अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेला होता.

Jalgaon Child Death : बाथरुमध्ये हिटरचा शॉक लागून मुलाचा मृत्यू, जळगावमधील धक्कादायक घटना
बाथरुमध्ये हिटरचा शॉक लागून मुलाचा मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 4:04 PM

जळगाव : हिटरचा शॉक (Shock) लागून अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची हृदयद्रावक घटना जळगावमध्ये घडली आहे. प्रणव मुकुंदा पाटील (13) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अखस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे घरावर शोककळा पसरली आहे. प्रणवचे आई वडिल हे भावाच्या घरी गेले होते. प्रणव घरी एकटाच होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घरी प्रणवच्या मोठ्या भावाच्या लग्नाची तयारी सुरु आहे. याच लग्नासाठी आलेले पाटील यांचे नातेवाईक रविंद्र पाटील हे घरी आले असता त्यांच्या ही घटना कळली. त्यांनी लगेच सर्व नातेवाईकांना बोलावले. (A 13-year-old boy died after being shock by a heater in a bathroom in Jalgaon)

काय आहे नेमके प्रकरण ?

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे मुकुंदा दामू पाटील हे आपली पत्नी आणि तीन मुलांसह राहतात. मुकुंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचा विवाह आहे. या विवाहाची जोरदार तयारी घरी सुरु आहे. यासाठीच मुकुंदा पाटील आणि त्यांची पत्नी दीपाली पाटील हे दोघे डिगंबर पाटील यांच्या घरी गेले होते. यावेळी प्रणव घरी एकटाच होता. दुपारच्या सुमारास प्रणव अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेला होता. यावेळी बादलीत हिटर लावलेले होते. अचानक प्रणवला विद्युत हिटरचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद

पाटील यांच्या घरी लग्नासाठी आलेले रविंद्र पाटील हे घरी आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आईवडिलांनी हंबरडा फोडला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (A 13-year-old boy died after being shock by a heater in a bathroom in Jalgaon)

इतर बातम्या

Nandurbar : डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेचा विवस्त्र करून छळ, प्रथेच्या नावाखाली नंदूरबारमध्ये धक्कादायक प्रकार

Video : फूड डिलिव्हरी बॉयला महिलेने चपलेनं बडवलं, जाणून घ्या काय आहे कारण

मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.