उद्धव ठाकरे यांचा असाही एक चाहता ज्यानी आपल्या मुलांची नावं ठेवलीत…
गाडीवर त्यांनी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या वेगवेगळ्या छबी असलेले फोटोग्राफ्स लावलेले आहेत. अत्यंत कठोर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे.
जळगाव : उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे सभा होत आहे. या सभेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक (Shiv Sainik) दाखल होत आहेत. असेच एक शिवसैनिक या पाचोऱ्याच्या सभेसाठी दाखल झाले आहेत. मोहन यादव असे त्यांचे नाव. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला ते हजर असतात. सभेला येताना ते त्यांची खास गाडी घेऊन येतात. गाडीवर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या वेगवेगळ्या छबी असलेले फोटोग्राफ्स लावलेले आहेत. अत्यंत कठोर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे.
मुलांची नाव आहेत राज आणि उद्धव
मोहन यादव यांनी आपल्या मुलांची नावं उद्धव आणि राज अशी ठेवली आहेत. हे कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी आले आहेत.
ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत
ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोहन यादव म्हणाले, मी ठरवलं की, अख्या महाराष्ट्रात फिरायचं. उद्धव साहेब यांना परत मुख्यमंत्री करायचं. अशी आमच्या कुटुंबाची इच्छा आहे. जनतेचीही अशी इच्छा आहे. खासदार आणि आमदार यांची उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा नसली तरी जनतेला ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते.
मोहन यादव यांचे ६१ वर्षे वय आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आलो होतो. तेव्हा बाळासाहेब मला भेटायला खाली आले होते, अशी आठवण या कट्टर शिवसैनिकानं सांगितली. हा कट्टर कार्यकर्ता चांगलाच जोशात दिसत होता. त्यामुळे त्याच्यासभोवताल गर्दी जमा झाली होती. गाडीवर विशिष्ट रंगाचे आकर्षण त्याने केली होते.
मोहन यादव यांच्या नावाची चर्चा
पाचोरा येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात राज्यभरातून शिवसैनिक येत आहेत. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांना मानणारे काही कार्यकर्ते आहेत. ते त्यांच्या सभेला नक्कीच येतात. मोहन यादव हे त्या कट्टर शिवसैनिकांपैकी एक आहेत. त्यामुळे मोहन यादव यांच्या नावाची चर्चा होत आहे.