शरद पवार यांचा भाजपला मोठा झटका, जळगावात मोठं खिंडार, ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला मोठा झटका दिला आहे. जळगावचा बडा नेता असलेल्या एका माजी आमदाराने भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय.

शरद पवार यांचा भाजपला मोठा झटका, जळगावात मोठं खिंडार, 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 2:50 PM

जळगाव | 5 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच भाजपला मोठा झटका दिल्याची बातमी ताजी असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला झटका दिलाय. भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी काल ठाकरे गटात प्रवेश केला. साजन पाचपुते आपल्या आईसह 250 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आले होते. त्यांचा काल पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आता शरद पवार यांनी भाजपला मोठा झटका दिलाय.

जळगाव जिल्ह्यात तब्बल तीन वेळा आमदारकी भूषविणारा भाजप नेता बी एस पाटील आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे फक्त बी एस पाटील हेच नाहीत तर आणखी काही माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे जळगावात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

शरद पवार मंत्री अनिल पाटील यांच्यावर काय बोलणार?

शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. त्यांची जळगावात आज सभा पार पडणार आहे. जळगावच्या अमळनेर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री अनिल पाटील निवडून आले आहेत. अनिल पाटील यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात शरद पवार काय प्रहार करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बी एस पाटील तीन वेळा आमदार

बी एस पाटील हे खान्देशातील मोठं नाव आहे. ते तीनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांना 2009 च्या निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते स्वगृही भाजपात परतले होते.

बी एस पाटील हे 2019 मध्ये चर्चेत आले होते. भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात वाद उफाळला होता. विशेष म्हणजे अमळनेरला एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उदय वाघ यांच्या समर्थकांनी बी एस पाटील यांना मारहाण केली होती. यावेळी मंचावर मंत्री गिरीश महाजन हे देखील होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.