अमित शाह यांनी जळगावात लोकसभेचं रणशिंग फुंकलं, तरुणांना साद, विरोधकांवर घणाघात

"तुमच्यापैकी अनेक जण पहिल्यांदा मतदान करतील. मी त्या तरुणांना विशेषत: सांगायला आलो आहे, तुमचं मत त्या पक्षाला द्या जो पक्ष भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर बसवू शकेल, महान भारताची रचना करु शकेल. आपलं मत लोकशाहीला मजबूत करणाऱ्या पक्षाला द्या", असं आवाहन अमित शाह यांनी केलं.

अमित शाह यांनी जळगावात लोकसभेचं रणशिंग फुंकलं, तरुणांना साद, विरोधकांवर घणाघात
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 5:22 PM

जळगाव | 5 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची आज जळगावात जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. जळगावात भाजप युवा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अमित शाह यांनी युवकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. “मी आपल्यासोबत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत बातचित करायला आलो आहे. तरुण मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की, उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आहे. पण या गैरसमजात राहू नका. येणारी निवडणूक ही 2047 मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्यासाठी आहे. 2047 मध्ये मंचावर खूप कमी लोकं असतील, पण मंचासमोर बसलेले सर्व तरुण सहकारी असतील. ही निवडणूक आपल्यासाठी आहे. ही निवडणूक भारताच्या तरुणांची आणि भारताच्या भविष्यासाठी आहे. भाजपला मत म्हणजे तरुणांच्या उज्ज्वल भविष्याला मत. भाजपला मत म्हणजे महान भारताच्या रचनेला मत. भाजपला मत म्हणजे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणं”, असं अमित शाह म्हणाले.

“तुमच्यापैकी अनेक जण पहिल्यांदा मतदान करतील. मी त्या तरुणांना विशेषत: सांगायला आलो आहे, तुमचं मत त्या पक्षाला द्या जो पक्ष भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर बसवू शकेल, महान भारताची रचना करु शकेल. आपलं मत लोकशाहीला मजबूत करणाऱ्या पक्षाला द्या. मला सांगा, जे पक्ष आपल्या पक्षात लोकशाही ठेवत नाही, घराणेशाहीने जे पक्ष चालतात, असे पक्ष देशाच्या लोकशाही आणि आपल्यासाठी आहेत का? अरे काय नाही? तुम्ही झोपत नाहीत. तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप पक्ष आहे. देशाच्या तरुणांसाठी नरेंद्र मोदींनी विकसित भारतचं लक्ष ठेवलं आहे. मोदींनी दहा वर्षात भारताला सुरक्षित करायचं काम केलं आहे”, असं अमित शाह म्हणाले.

‘तेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे’

“सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांचं सरकार होतं तेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट करुन पळून जायचे. काहीच प्रत्युत्तर दिलं जायचं नाही. मोदीजी आले उरी आणि पुलवामामध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. दहाच दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्टाईक आणि एअर स्ट्राईक करुन आतंकवाद्यांना संपवलं”, असं शाह म्हणाले. “काश्मीर आपला आहे की नाही? काश्मीर भारताचा भाग आहे की नाही? मोदींनी काश्मीरला भारताशी जोडलं. काँग्रेसने कलम 370 ला 70-70 वर्ष लटकवत राहिली. तुम्ही मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केलं. मोदींनी कलम 370 हटवली”, असं अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले.

‘पाच वर्षात रक्ताच्या नद्या सोडा, साधा दगडही…’

“राहुल बाबांना ओळखता ना. ते मला संसदेत म्हणायचे ३७० कलम हटवू नका. रक्ताच्या नद्या वाहतील असं राहुल गांधी म्हणायचे. राहुल बाबा ३७० कलम हटवलं. पाच वर्षात रक्ताच्या नद्या सोडा, साधा दगडही उगारला गेला नाही. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा काँग्रेसने म्हणाले, अर्थतज्ज्ञ पंतप्रधान बनवलं. वाजपेयींनी देशाला ११ व्या नंबरची अर्थव्यवस्था केलं. काँग्रेसने देशाला ११व्याच नंबरला ठेवलं. मोदींनी पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था केली”, असा दावा अमित शाह यांनी केला.

“सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवार यांना सुप्रियाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. ममता बॅनर्जींना भाच्याला मुख्यमंत्री करायचं आहे. तुमच्यासाठी कोणीच नाही. पण तुमच्यासाठी मोदी आहे. मोदींनी विकसीत भारताचं लक्ष ठेवलं आहे. महान भारताचं टार्गेट ठेवलं आहे. मोदींनी दहा वर्ष भारताला सुरक्षित ठेवण्याचं काम केलं”, असंही शाह यावेळी म्हणाले.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.