भुसावळ पोलिसांनी खतरनाक दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; 2 पिस्तूल, 5 तलवारी, 4 चाकू, 1 फायटर, मिरचीपूड जप्त

जळगावच्या भुसावळमध्ये पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई केली आहे. सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सात सदस्यांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चार जिवंत काडतुसे, दोन पिस्तूल, तलवारी आणि चाकू जप्त केले आहेत. आरोपी मध्य प्रदेश, खंडवा आणि फैजपूर येथील असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

भुसावळ पोलिसांनी खतरनाक दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; 2 पिस्तूल, 5 तलवारी, 4 चाकू, 1 फायटर, मिरचीपूड जप्त
भुसावळ पोलिसांनी खतरनाक दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 6:34 PM

जळगावच्या भुसावळमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सशस्त्र धाडसी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार जिवंत काडतूस, दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, पाच तलवारी, चार चाकू, एक फायटरसह मिरचीची पूड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात संशयित आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत माहिती दिली आहे.

जळगावच्या भुसावळ-नागपूर महामार्गालगत वाटर पार्क परिसरात सशस्त्र धाडसी दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेत पोलिसांनी मॅकझिनसह दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतूस, पाच तलवारी तसेच चार चाकू, एक फायटर आणि मिरचीची पूड असा मुद्देमाल जप्त केला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात सात दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या पोलिसांच्या कामगिरीची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

पुण्यात सोन्याच्या दुकानात सशस्त्र दरोडा

दरम्यान, पुण्यात नुकतीच सोन्याच्या दुकानात सशस्त्र दरोड्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानात दरोडा टाकला. संबंधित घटना ही घोरपडीतील बी टी कवडे रस्त्यावर असलेल्या अरिहंत ज्वेलर्समध्ये घडली. बंदुकीचा धाक दाखवून दोन व्यक्तींनी सोन्याच्या दुकानात दरोडा टाकला. संबंधित घटना ही काल रात्री सव्वा नऊ वाजता घडली. या घटनेत दुकानदार किरकोळ जखमी झाला आहे. तीन आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांनी पिस्टलचा धाक दाखवत दुकानातील दुकानदाराच्या डोळ्यात स्प्रे टाकून संपूर्ण दुकान लुटलं. आरोपी भीती दाखवत, दुकानदाराच्या पाठीत उलटा कोयता मारून, सोनं लुटून फरार झाले आहेत. या प्रकरणी मुंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....
परभणीत काय घडलं? सोमनाथ सूर्यवंशीसोबत काय झालं? राहुल गांधींचा आरोप
परभणीत काय घडलं? सोमनाथ सूर्यवंशीसोबत काय झालं? राहुल गांधींचा आरोप.