“जल जीवन मिशन योजना म्हणजे फक्त रंगरंगोटी”; ‘या’ जिल्ह्यात झाला मोठा भ्रष्टाचार; राष्ट्रवादीचे सरकारवर गंभीर आरोप

शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्यावेळी राबवण्यात येतात. त्यावेळी या सरकारडून भ्रष्टाचार केले गेला आहे. त्यामुळे आता या सरकारने जुन्याच कामांवर रंगरंगोटी करून बिले उकळण्याचे कामही त्यांनी केले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

जल जीवन मिशन योजना म्हणजे फक्त रंगरंगोटी; 'या' जिल्ह्यात झाला मोठा भ्रष्टाचार; राष्ट्रवादीचे सरकारवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 5:40 PM

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. कधी अजित पवार, तर कधी शरद पवार यांच्यावर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही भाजप आणि शिवसेनेवर गंभीर आरोपर केले जात आहेत. राज्यात वर्षभरावपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर आता महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असून योजनांच्या नावावर पैसा उकळण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही त्यांच्याकडून केला जात आहे.

तर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून जुन्याच काांवर रंगरंगोटी केल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात जल जीवन मिशन योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले असल्याची टीकाही त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

जुन्याच कामांवर रंगरंगोटी

शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्यावेळी राबवण्यात येतात. त्यावेळी या सरकारडून भ्रष्टाचार केले गेला आहे. त्यामुळे आता या सरकारने जुन्याच कामांवर रंगरंगोटी करून बिले उकळण्याचे कामही त्यांनी केले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कामांची चौकशी करा

जल जीवन मिशन योजनेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बोदवड तालुक्यातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यासह जल जीवन मिशन योजनेच्या कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. त्याच बरोबर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाणीटंचाई असल्याचाही आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे

पाण्यासाठी वणवण भटकंती

बोदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. महिना महिनाभर नळांना पाणी येत नाही. तीव्र पाणीटंचाई असताना प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात आलेली नाहीत असंही रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.

बोदवड तालुक्यातील पाणीटंचाई तात्काळ सोडवली गेली नाही व जनजीवन मिशन योजनेच्या कामांची चौकशी झाली नाही तर राष्ट्रवादीच्यावतीने उपोषणाटा इशाराही रोहिणी खडसे यांनी दिला आहे.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.