‘अजित पवार धूर्त राजकारणी…’, गिरीश महाजन ‘हे’ काय बोलले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिवाळीच्या निमित्ताने भेट घडून आलीय. दोन्ही नेत्यांची गेल्या आठवड्यातही भेट घडून आली होती. त्यानंतर अजित पवार दिल्लीला गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. असं असताना आता गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना धूर्त राजकारणी म्हटलं आहे.

'अजित पवार धूर्त राजकारणी...', गिरीश महाजन 'हे' काय बोलले?
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 5:15 PM

जळगाव | 15 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घडून आलीय. दिवाळीच्या निमित्ताने या दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये भेट घडून आली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली तेव्हा दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अजित पवार दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अजित पवारांच्या या दिल्ली दौऱ्यानंतर त्यांची काल पुन्हा शरद पवार यांच्यासोबत भेट घडून आली. त्यामुळे या भेटीगाठींवर चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना धूर्त राजकारणी म्हटलं आहे.

“उपमुख्यमंत्री अजित पवार धुर्त राजकारणी आहेत म्हणून ते इतके वर्ष राजकारणात आहेत”, असं भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत. “अजित पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार यांच्याकडून किंवा त्यांच्या गटाच्या नेत्यांकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“अजित पवार धूर्त राजकारणी आहेत. त्यामध्ये चूक काय? अजित पवार धूर्त राजकारणी आहेत म्हणूनच ते एवढे वर्ष टिकून आहेत. आतासुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते बाहेर पडले त्यावेळेला त्यांच्या सोबत 54 आमदारांपैकी 42 आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे याबाबत दुमत असल्याचं कारणच नाही. ते धूर्त राजकारणी आहेतच”, असं गिरीश महाजन म्हणाले.

‘अजित पवार यांची गळचेपी होत असल्याने…’

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत वेगळा दावा केलाय. “अजित पवार यांची गळचेपी होत असल्याने ते दिल्लीला गेले. तिथे जावून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विसर्जनानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवारांकडून अमित शाहांची भेट घेण्यात आली”, असा दावा विनायक राऊत यांनी केला. तसेत “अजित पवारांना पश्चात्ताप होतोय. या पश्चात्तापासाठी कसं मुक्त व्हावं यासाठी ते विचार करत आहेत”, असा मोठा दावा राऊतांनी केलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.