‘मी भाजपमध्ये सर्वात सिनियर’, गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Oct 11, 2024 | 9:15 PM

"मी भाजपमध्ये सर्वात सिनियर आहे, हे माझं भाग्य आहे. 6 वेळा आमदार, 10 वर्ष मंत्री होतो. एका शिक्षकाचा मुलगा आमदार आणि मंत्री होतो, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे", असं गिरीश महाजन आपल्या भाषणात म्हणाले.

मी भाजपमध्ये सर्वात सिनियर, गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य
भाजप नेते गिरीश महाजन
Follow us on

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात आज महायुतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावर झालं. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी भाषण करताना आपण भाजपमध्ये सर्वात सिनियर अल्याचं वक्तव्यत केलं. “माझ्या मनामध्ये शब्द होता. कार्यकर्त्यांच्या मनात स्वप्न होतं की, जामनेर शहरामध्ये आमचा जाणता राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व्हावं. त्यांचा भव्यदिव्य पुतळा असावा आणि आज प्रत्यक्षात आपण बघतोय. राज्यात कुठे नसेल असा राजांचा दरबार याठिकाणी असेल. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, अण्णा भाऊ साठे असे सर्व पुतळे आपण भविष्यात उभारणार आहोत. जामनेर शहर आणि तालुका कसा झाला हे बघण्यासाठी राज्यभरातील देशभरातील लोक या ठिकाणी येतील आणि आले पाहिजे”, असं गिरीश महाजन म्हणाले.

“मी भाजपमध्ये सर्वात सिनियर आहे, हे माझं भाग्य आहे. 6 वेळा आमदार, 10 वर्ष मंत्री होतो. एका शिक्षकाचा मुलगा आमदार आणि मंत्री होतो, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे. सहा टर्म मला, सात टर्म बायकोला निवडून येणं सोप नाही आणि मला पाडून टाकू, अशा गप्पा करत आहेत. अरे पण तुम्ही काय केलं?”, असा सवाल गिरीश महाजन यांनी विरोधकांना केला.

“माझ्या डोक्यात कधी हवा गेली नाही की, आमदार झालो मंत्री झालो. तुम्ही 35 वर्ष आम्हाला निवडून दिलं. मी तुमच्यात सहभागी झालो. उर्वरित आयुष्य फक्त तुमच्यासाठी. जामनेर तालुक्यासाठी या ठिकाणच्या लोकांसाठी. तुमच्या उपकाराची फेड कशी करू? त्याचा एक थोडासा प्रयत्न करतो आहे. रावेर यावल तालुक्याला आपण मागे एवढी केळी आपल्याकडे होईल यासाठी 55 हजार हेक्टर जमीन आपण पाण्याखाली आणतो आहे. असं जामनेर करायचं आहे जे देशात कुठेही नाही. हेच माझ्याकडून तुमच्या उपकाराची परतफेड होईल, असे मला वाटते”, असं गिरीश महाजन म्हणाले.

गिरीश महाजन यांचं तरुणांना आवाहन

“तरुणांना विनंती की सर्व करा पण व्यसन करू नका. मिरवणुकीत आज खूप जण बघितले. खूप वास मारत आहेत. हात जोडून विनंती करतो. आज संकल्प करा की, विमल, सुमन असं काही खाणार नाही. व्यसन करणार नाही, अशी शपथ घ्या आणि आदर्श घ्या. मी उभा आहे म्हणजे तुम्ही उभे आहात. मी आमदार होणार म्हणजे तुम्ही होणार. मी मंत्री म्हणजे तुम्ही मंत्री होणार आहात, या भावनेने सगळ्यांनी तुम्ही जबाबदारी सांभाळायची आहे”, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं.

“सकाळचा भोंगा किती भोंगा मारतो. चिकाट्या मारतो. राज्यात 50 वर्ष राज्य केलं. पण तुम्ही काय केलं नाही. ते आता भोंगे पसरवीत आहेत. तुम्ही काय केलं, तुम्ही काय ओरडता? म्हणे, तिजोरी खाली झाली. पगार कुठून देणार? अरे आम्ही पगार देवू ना बरोबर. तुम्हाला काय करायचे? बहिणींना आम्ही पुढच्या वेळी 3 हजार देवू. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले, बाकीच्या सर्वांना झोप येत नाहीय. आपलं कस होईल? अशी भीती यांना वाटत आहे. आमच्याकडे 29 नगरसेवक आहेत. त्यापैकी 8 आमचे मुस्लिम आहेत. राज्यात जामनेर नगरपालिका एकमेव आहे. दुसऱ्या पक्षाचा याठिकाणी सुपडा साफ झाला आहे. जगामध्ये नरेंद्र मोदी यांचा एकच डंका आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.