खान्देशाच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप, जयकुमार रावल यांच्या ‘सावली’ने साथ सोडली, कामराज निकम शरद पवार गटात जाणार

खान्देशाच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. कारण माजी मंत्री तथा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांचे अत्यंत निष्ठावान आणि उजवे हात समजले जाणारे कामराज निकम हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे कामराज निकम यांनी जयकुमार रावल यांच्या अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शिंदखेड्यात एकच खळबळ उडाली आहे.

खान्देशाच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप, जयकुमार रावल यांच्या 'सावली'ने साथ सोडली, कामराज निकम शरद पवार गटात जाणार
जयकुमार रावल यांच्या 'सावली'ने साथ सोडली, कामराज निकम शरद पवार गटात जाणार
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 7:50 PM

मनेश मासोळे, Tv9 मराठी प्रतिनिधी, धुळे : खान्देशाच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. कारण माजी मंत्री तथा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक कामराज निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत, अशी माहिती समोर आली आहे. कामराज निकम हे गेल्या 20 वर्षांपासून जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक आहेत. ते रावल यांच्या पाठीमागे सावलीसारखे उभे राहिले आहेत. जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा मतदारसंघात कामराज निकम यांचे मोठे काम आहे. तसेच या मतदारसंघात कामराज निकम यांचं नाव घेतलं म्हणजे जयकुमार रावल आणि जयकुमार रावल यांचं नाव घेतलं म्हणजे कामराज दादा, असं भावनिक समीकरण मतदारसंघांमधील कार्यकर्त आणि नागरिकांमध्ये आहे. पण जयकुमार रावल यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे कामराज निकम हे आता शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हा परिषदेवर भाजपची पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर कामराज निकम यांच्या पत्नीकडे उपाध्यक्ष पदाची धुरा होती. कामराज निकम यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत. कामराज यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे जाण्याच्या निर्णय घेतल्याने शिंदखेडा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामराज निकम यांचा शरद पवार गटात होणारा प्रवेश हा भाजपला खान्देशातला सर्वात मोठा धक्का मानला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कामराज निकम यांचा उद्या पुणे येथे पक्षप्रवेश होणार आहे.

कामराज निकम यांचे जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप

कामराज निकम यांनी स्वत: आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. 32 वर्ष पक्षवर निष्ठा ठेवूनदेखील न्याय मिळत नाही, या भावनेतून आपण वेगळा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी जयकुमार रावल यांच्यावरही टीका केली. “20 वर्षांपासून जयकुमार रावल घोषणा करत आहेत. पण एक टक्कादेखील सिंचनाचं काम या तालुक्यात होऊ शकलं नाही. तालुक्यातील 100 गावांना प्यायला पाणी नाही. सलग 20 वर्ष तालुक्याचे नेतृत्व करून देखील 100 गावांना प्यायला पाणी नाही. हे जयकुमार रावल यांचं अपयश आहे”, असा आरोप कामराज निकम यांच्याकडून आमदार जयकुमार रावल यांच्यावर करण्यात आला आहे.

“आमदार जयकुमार रावल यांची मोठी दहशत आहे. ते स्वतःला राजा समजतात. मात्र राजासारखे वागत नाहीत. त्यांच्या स्वभावाला कंटाळून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत संपूर्ण भाजप रिकामी होईल. त्यांनी अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले. येणाऱ्या काळात मी जर भाजपात गेलो तर मला आणि माझ्या मुलांना कायमस्वरूपी जेलमध्ये टाकणार अशी मला धमकी देण्यात आली आहे”, असा धक्कादायक आरोप कामराज निकम यांनी जयकुमार रावल यांच्यावर केला आहे. आमदार जयकुमार रावल यांचे अत्यंत निष्ठावान आणि उजवे हात समजले जाणारे कामराज निकम यांनीच जयकुमार रावल यांच्यावर असे गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.