“ज्यांनी या राज्याला लुटलं त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणार”; भाजप मंत्र्याने विरोधकांना ठणकावून सांगितले
तुमच्या सभेमुळे तुमच्या सर्व भ्रष्टाचारांवर पांघरून घालणार का असा सवालही त्यांनी विरोधकांना केला आहे. त्यामुळे आता ईडी कारवाईवरून राज्यातील राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर दुसऱ्यांदा ईडीने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या छापेमारीनंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कारवाई ही होणारच असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून विरोधकांना नेस्तानाभूत करण्यासाठी अशा प्रकारचा कारवाई केली जात असल्याची टीका केली जात आहे.
ईडीच्या कारवाईवरून आता सत्ताधारी पक्षातर्फे टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी हसन मुश्रीफ आणि खासदार संजय राऊत यांच्याविषयी बोलताना सांगितले की, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या ईडीच्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात ते स्वच्छ असल्यानेच ईडीकडून त्यांच्यावर कारवाई केली असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आज ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि काँग्रेसनेही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी त्याना उत्तर देताना ते म्हणाले की, तुम्ही जे पाप केलं ते तुम्हाला भरावेच लागणार असल्याचा इशाराच मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.
त्यातच दुसरीकडे ठाकरे गटाच्या राज्यातील वेगवेगळ्या भागात सभा चालू आहेत. त्यावरही टीका करताना ते म्हणाले की, तुमच्या सभा झाल्या म्हणजे ईडी कारवाई करणार नाही का ? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे.
त्याचबरोबर तुमच्या सभेमुळे तुमच्या सर्व भ्रष्टाचारांवर पांघरून घालणार का असा सवालही त्यांनी विरोधकांना केला आहे. त्यामुळे आता ईडी कारवाईवरून राज्यातील राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
सत्ताधारी पक्षावर ईडीच्या कारवाईबद्दल टीका केली जात आहे मात्र ईडीची कार्यवाही ही नियमाने केली जात आहे. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तर विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, ज्यांनी या राज्याला लुटलं त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई ही होणारच असल्याचा इशारा त्यांनी गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ यांना दिला आहे.