‘त्यांनी डकार देऊन खाल्लं, त्यांचं हिसकावण्यात मला आनंद’, आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना डिवचलं

"एकनाथ खडसेंचा स्वभाव सर्वांना माहीत आहेत. ते सर्वांना हूक लावून ठेवतात. कोणालाच पुढे जाऊ देत नाहीत", असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला.

'त्यांनी डकार देऊन खाल्लं, त्यांचं हिसकावण्यात मला आनंद', आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना डिवचलं
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 7:43 PM

खेमचंद कुमावत, जळगाव : चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. “एकनाथ खडसेंचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. ते हुक लावून ठेवतात, कुणालाच पुढे जाऊ देत नाहीत. असे काही लोकं असतात”, असा घणघात मंगेश चव्हाण यांनी केला. जळगाव दूध संघाचे अध्यक्ष, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या स्वतःच्या सत्कार समारंभात बोलताना एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली. “एकनाथ खडसेंचा स्वभाव सर्वांना माहीत आहेत. ते सर्वांना हूक लावून ठेवतात. कोणालाच पुढे जाऊ देत नाहीत”, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

“अशा लोकांकडून मागून मिळत नाही म्हणून हिसकवून घ्यावं लागतं. ज्यांनी एवढं डकार देऊन खाल्लं आहे त्यांचं हिसकवलं तर काही वाटत नाही. एखाद्या गरीबाचं हिसकवण्यापेक्षा खडसेंचं हिसकवण्यात मला जास्त आनंद मिळाला”, अशी खोचक टीका मंगेश चव्हाण यांनी केली.

“खरंतर प्रत्येक नेत्याचा किंवा नेतृत्वाचा एक काळ असतो. खडसेंनी एक समजून घेतलं नाही की त्यांच्यामागे जे वलय होतं ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आणि पक्ष संघटनेच्या नेतृत्वाचं होतं. पण त्यांना मी मोठा झालो, असं वाटत होतं”, असा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

“मी म्हणजे पक्ष, मी म्हणजे संघटना, मी ठरवेल ती दिशा, अशा भूमिकेत गेल्यामुळे त्यांना या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांना गर्व होता. जळगावची जनता खडसे आणि त्यांच्या परिवाराच्या मागे उभी नव्हती. तर भाजप पक्ष आणि विचारधारेच्या मागे उभी होती हे आता सिद्ध झालंय”, असा दावा मंगेश चव्हाण यांनी केला.

“बलाढ्य समजल्या जाणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार स्वत:लाच समजून घेणाऱ्या लोकांना घरचा रस्ता दाखवून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला संधी दिली. याचाच अर्थ माझ्या सारख्या कार्यकर्त्याकडे अपेक्षा आहेत. निश्चित दूध उत्पादक संस्था आणि मतदार यांच्या अपेक्षेला साजेसेच असं काम करेन, असं मी आश्वस्त करतो”, असं मंगेश चव्हाण म्हणाले.

“एका प्रस्थापित शक्तीच्या पुढे, एका विस्थापित जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, अशा सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला भाजपचे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सहकार्य मिळालं. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून सहकार्य मिळालं. त्यामुळे आज दूध संघाचं नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. याचा मला आनंद होतोच आहे. पण त्यापेक्षा अधिक जबाबदारी वाढल्याची जाणीव आहे”, असंदेखील मंगेश चव्हाण म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.