“मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये नातं काय?”; शिवसेनेच्या नेत्यानं युतीचं वेगळेपण सांगितलं…

जाहिरातीतील चूक ही जाणीवपूर्वक झाली असं मला वाटत नाही, कारण चूक लक्षात आल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे हेवदावे नव्हते त्यामुळे झालेली चूक दुरुस्त करण्यात आली आहे

मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये नातं काय?; शिवसेनेच्या नेत्यानं युतीचं वेगळेपण सांगितलं...
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 7:03 PM

जळगाव : राज्य सरकारची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. विरोधकांनी शिवसेना-भाजपच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीही झाली होती. तर आता सरकारच्या या जाहिरातीच्या समर्थनाथ मंत्री गुलाबराव पाटील मैदानात उतरले आहे. या सरकारच्या जाहिरातीचे समर्थन करताना त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आयलव्हयूचं नातं असल्याचे सांगून सरकारमध्ये सगळे आलबेल असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि भाजपच्या सरकारच्या कारभाराचा विश्वास दाखवत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे वाद अथवा मतभेद नसून या सरकारचे काम योग्य पद्धतीने चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.

माणसू कितीही हुशार असला तरी

गेल्या काही दिवसांपासून जाहिरातीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचा वाद उफाळून आलेला होता. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर बोलतांना गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाते सरकार चालवण्यासाठी योग्य असून त्यांचे नाते हे आयलव्हयूचं असल्याचे सांगत या सरकारविषयी त्यांनी विश्वास बोलून दाखवला. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, माणसू कितीही हुशार असला तरी जाहिरात देताना चुका होत असतात.

प्रत्येकाच्या मनात त्या गोष्टी

त्याचबरोबर या जाहिरात म्हणजे स्वत:चं मत आहे असं मला वाटतं नाही. कारण आम्हीही गाव पातळीवर कधी कधी जाहिराती देत असतो मात्र त्यामध्ये सरपंचाचा फोटो राहून जात असतो. त्यामुळे अशा प्रकारे या मोठ्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मनात त्या गोष्टी येऊ शकतात असे मत त्यांनी जाहिरातीबद्दल व्यक्त करताना सांगितले.

ती चूक जाणीवपूर्वक नाही

जाहिरातीतील चूक ही जाणीवपूर्वक झाली असं मला वाटत नाही, कारण चूक लक्षात आल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे हेवदावे नव्हते त्यामुळे झालेली चूक दुरुस्त करण्यात आली आहे असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. उद्या राष्ट्रवादीने काँग्रेसची तशी जाहिरात दिली आणि चूक झाली तर असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.