ED Raids | महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याच्या कार्यालयावर छापेमारी, काय आहे शरद पवार कनेक्शन?

ED Raids | ईडीच्या 60 सदस्यीय पथकाकडून ही चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असातना ग्राहकांना आत जाण्याची परवानगी नव्हती. त्याचवेळी आतमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवण्यात आलं.

ED Raids | महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याच्या कार्यालयावर छापेमारी, काय आहे शरद पवार कनेक्शन?
ED Raid on rajmal lakhichand jewellers
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 3:29 PM

जळगाव : ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाने जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आणि माजी खासदार ईश्वर लाल जैन यांच्या सहा कंपन्यांवर मुंबई, नाशिकसह अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. कोषाध्यक्ष असल्याने पार्टीला मिळालेली फंडिंग आणि कागदपत्रांसह अनेक कारणांमुळे चौकशी सुरु आहे. या कारवाईमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत खळबळ उडाली आहे.

जळगाव आणि नाशिकच्या एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून या सगळ्या ठिकाणी तपास सुरु होता. कुठल्या कारणामुळे चौकशी झाली ते समजू शकलेलं नाही. काही राजकीय कारणांमुळे ही चौकशी झाल्याच काही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलय.

किती ठिकाणी ईडीची कारवाई?

मुंबई, नागपूर, औरंगाबादमध्ये सुद्धा ईडीने कारवाई केली. गुरुवारी जळगावमध्ये एकाचवेळी दहा गाड्या दाखल झाल्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या जळगाव-नाशिकमधील एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणची संपत्ती आणि कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. मनीष जैनची सुद्धा अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली.

कारवाईसाठी ईडीची किती जणांची टीम आलेली?

ईडीच्या 60 सदस्यीय पथकाकडून ही चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असातना ग्राहकांना आत जाण्याची परवानगी नव्हती. त्याचवेळी आतमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवण्यात आलं. दोन्ही टीम्स कुठल्या कारणामुळे चौकशी करत होते, ते समजलेलं नाही. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी केली होती. शरद पवारांचा कोणी समर्थन केलं?

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी शरद पवार यांचं समर्थन केलं होतं. ईश्वरलाल जैन बराचकाळ विधान परिषदेवर आमदार होते. मनीष जैन यांनी शरद पवार यांची साथ सोडली व अजित पवारांसोबत गेले. ईश्वरलाल जैन 10-15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार होते.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.