जळगावमध्ये पुन्हा खडसे विरुद्ध महाजन, खडसे म्हणातात महाजनांनी भाजप विकली…तर महाजन म्हणतात…

बोदवड नगरपंचायती बाबतीत खडसे यांना काही म्हणू द्या, बोदवडमध्ये ते हरले आहेत, आता कारणं कशाला सांगता? असा सावल गिरीश महाजन यांनी उपस्थित केलाय. त्यावर खडसेंनीही पलटवार केलाय.

जळगावमध्ये पुन्हा खडसे विरुद्ध महाजन, खडसे म्हणातात महाजनांनी भाजप विकली...तर महाजन म्हणतात...
गिरीश महाजन- एकनाथ खडसे वादाचा दुसरा एपिसोड
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 3:37 PM

जळगाव : गिरीश महाजन (Girish Mahajan) विरुद्ध एकनाथ खडसे (Eknath Khadse) हा संघर्ष खडसे राष्ट्रवादीत (Bjp Vs Ncp) गेल्याावर आणखी उघडपणे तीव्र झाला. ना खडसे महाजनांवर टीका करण्याची एक संधी सोडतात, ना महाजन खडसेंवर टीका करण्याची संधी सोडतात. गेल्या काही महिन्यात तर या संघर्षाला आणखी धार आली आहे. काही दिवसांपूर्वीच खडसेंना ठाण्याच्या रुग्णालयात दाखवण्याची गरज आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती तर महाजनांना बुधवार पेठेत नेण्याची गरज आहे, असा पलटवार खडसेंनी केला होता. त्याआधीही खडसेंना कोरोनाची लागण झाल्यावरून महाजनांनी टीका केली होती, तर महाजनांना कोरोना झाल्यावर खडसेंनी पलटवार करण्याची संधी सोडली नव्हती. महाजनांना मोक्का लागण्याच्या भितीने तर कोरोना झाला नाही ना? असा सवाल खडसेंनी विचारला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे, यावेळी त्याला कारण ठरलंय नगरपंचायतीची निवडणूक.

जिंकायला दम लागतो-महाजन

बोदवड नगरपंचायती बाबतीत खडसे यांना काही म्हणू द्या, बोदवडमध्ये ते हरले आहेत, आता कारणं कशाला सांगता? असा सावल गिरीश महाजन यांनी उपस्थित केलाय. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो, ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. तर विधानसभेतही खडसे पडले, मुक्ताईनगरमध्ये त्यांची सत्ता नाही, त्यांच्या गावातच त्यांची सत्ता नाही, असा टोलाही महाजन यांनी लगावला आहे. खडसे पराभव झाल्यावर काहीही कारणं सांगून पुंगी वाजवत बसतात अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. गिरीश महाजान यांच्या या टीकेला राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महाजनांनी भाजप विकली-खडसे

जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी केलेल्या छुप्या युतीमुळे भाजपा विकून टाकली, असे म्हणत खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. बोदवड नगरपंचायत निवडणुकीत आम्ही आधीच पराजय स्वीकारला आहे. मात्र भाजपाची इतकी वाईट परिस्थिती जिल्ह्यात कधीही नव्हती, असा चिमटा एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना काढला आहे. कशाचा दम लागतो? भाजपाला दुसऱ्याचा आधार घेऊन एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी लढावे लागते ही चिंताजनक बाब असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून खडसे आणि महाजन यांच्यातील हे वार पलटवार सुरूच आहेत, आता नगरपंचायती निवडणुकीत या वादाला आणखी धार आली आहे.

औरंगाबादेत महाराणा प्रतापांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये; मंत्री अब्दुल सत्तारांचं खा. इम्तियाज जलील यांना आव्हान!

सेनानी, महान व्यक्तिमत्त्व; प्रवीण दरेकर म्हणतात, मलिक मुस्लिम समाजाचे असल्याने हिंदुद्वेष्ट्ये

Tipu Sultan: दंगल करून दाखवाच, इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊत यांचं भाजपला आव्हान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.