‘त्यावेळी आरोपींच्यासोबत कारमध्ये एक मुलगी होती’, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट, जळगाव हिट अँड रन प्रकरणाला वेगळं वळण

जळगाव हिट अँड रन प्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. जळगाव अपघातील आरोपींना कुणाकुणाचे फोन आले याबाबत सीडीआर तपासा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करत नाहीत, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केलाय.

'त्यावेळी आरोपींच्यासोबत कारमध्ये एक मुलगी होती', एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट, जळगाव हिट अँड रन प्रकरणाला वेगळं वळण
एकनाथ खडसेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 6:40 PM

जळगावच्या रामदेववाडी येथील अपघात झालेल्या कारमध्ये चार ते पाच जण आणि एक मुलगी आरोपींच्यासोबत असल्याचा गौप्यस्फोट आमदार एकनाथ खडसे यांनी केलाय. एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटामुळे रामदेववाडी येथील अपघात प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे. रामदेव वाडी येथील अपघात प्रकरणात एकनाथ खडसे यांनी पोलीस आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. जळगावच्या रामदेववाडी येथील अपघातात भरधाव कारने धडक दिल्याने महिला आणि तीन मुलं अशा चार जणांचा मृत्यू झाला होता.

जळगावच्या रामदेववाडी येथील अपघात प्रकरणी एकनाथ खडसे यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेत चर्चा केली. अपघात होण्यापूर्वी आरोपींना कुणाकुणाचे फोन आले याबाबत त्यांचे सीडीआर तपासा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. एक उच्चस्तरीय राजकारणी आणि दुसरा मंत्र्यांचा पीए असल्यामुळेच या प्रकरणात राजकीय दबाव आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांचे आरोप काय?

“पोलीस अधीक्षक यांचेसुद्धा सीडीआर तपासले पाहिजे. कारण त्यांनासुद्धा पुन्हा-पुन्हा मंत्र्यांचे फोन आले हे समोर येऊ शकेल”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. पोलीस अधीक्षक यांना सुद्धा मंत्र्यांचे या प्रकरणात फोन येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

“रामदेववाडी येथील अपघात प्रकरण हे संपूर्ण संशयाच्या भौऱ्यात आहे. आरोपींना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसतो आहे. त्यामुळे पोलीस हलगर्जीपणा करत आहेत, असं स्पष्टपणे दिसत आहे. आरोप आक्षेपार्ह असू शकतात. मात्र या प्रकरणातला सत्य बाहेर आलं पाहिजे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

पुण्याच्या घटनेची नोंद सरकार जेवढ्या गंभीरतेने घेत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा चार जणांचा मृत्यू झाला असतानाही सरकार गंभीरतेने घेत नसल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी केली. आरोपी 17 दिवस रुग्णालयात राहण्यासारखे नव्हते. तरीही अटक केली नाही. राजकीय दबावामुळे पोलीस पाहिजे तशी या प्रकरणात कारवाई करत नाही, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

“या प्रकरणातील एका आरोपीचा बाप हा मंत्र्यांचा पीए आहे. तर दुसऱ्या आरोपीचे वडील हे उच्चस्तरीय राजकारणी आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर दबाव आहे. या प्रकरणात जाणीवपूर्वक आरोपींना मदत करण्याची भूमिका पोलिसांची दिसत आहे. पोलीस कुठल्यातरी राजकीय दबावाखाली प्रभावाखाली असल्याचं या प्रकरणात दिसत आहे”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....