VIDEO | एकनाथ खडसे म्हणतायत, गिरीश महाजन चावट, खडसे यांच्याकडे गिरीश महाजन यांची कोणती VIDEO CLIP

| Updated on: Nov 20, 2022 | 11:58 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आपल्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

VIDEO | एकनाथ खडसे म्हणतायत, गिरीश महाजन चावट, खडसे यांच्याकडे गिरीश महाजन यांची कोणती VIDEO CLIP
Follow us on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आपल्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. बंजारा समाजाने एकनाथ खडसे यांची माफी मागितलीय. तर दुसरीकडे एकनाथ खडसेंनी या प्रकरणारुन भाजप नेते गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय. महाजन यांची क्लिप आपल्याकडे असल्याचं खडसे म्हणत आहेत.

जळगावच्या जामनेरमध्ये एकनाथ खडसे एका कार्यक्रमात बोलताना बंजारा समाजाविषयी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात बंजारा समाजाचं दोन किलो मटन आणि एक बाटलीत होऊन जातं हे मी बघितला आहे.

या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावर बंजारा समाज चांगलाच आक्रमक झाला. ठिकठिकाणी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे खडसेंना आपले शब्द मागे घ्यावे लागले.

हे सुद्धा वाचा

याआधीच जळगाव जिल्हा दूध संघाच्या भ्रष्टाचार प्रकरणी खडसे यांच्यावर जोरदाट टीका करण्यात आली होती. त्यातच आता बंजारा समाजाकडून मागील वक्तव्याचा संदर्भ देत त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन त्यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला. गिरीश महाजन यांनी बंजारा समाजाचे दैवत सेवालाल महाराज यांच्या जयंती प्रसंगी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा खडसेंनी केलं आहे. त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.