Eknath Khadse : सरळ सामना करण्याची ताकद नाही, म्हणून तपास यंत्रणांच्या आडून छळ; एकनाथ खडसेंचा गिरीष महाजनांवर हल्लाबोल

काहीही तथ्य नसताना शोधा, असे सांगणे म्हणजे निव्वळ आकसापोटी आणि राजकीय सुडापोटी कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले. ईडी, सीबीआय, अँटी करप्शन अशा कारवाया सुरू आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Eknath Khadse : सरळ सामना करण्याची ताकद नाही, म्हणून तपास यंत्रणांच्या आडून छळ; एकनाथ खडसेंचा गिरीष महाजनांवर हल्लाबोल
एकनाथ खडसे/गिरीष महाजनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 5:12 PM

मुक्ताईनगर, जळगाव : गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जळी, स्थळी नाथाभाऊ दिसतो. गिरीश महाजन यांच्यामध्ये माझ्या समोर सरळ सामना करण्याची ताकद नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. ते मुक्ताईनगरात बोलत होते. वेगवेगळ्या मार्गाने अडकवण्याचा प्रयत्न आजचा नाही, तर पहिल्यापासूनचा आहे. भोसरी प्रकरणात झोटिंग चौकशी झाली. कुठलाही तथ्य (Anti Corruption Bureau) समोर नाही. झोटिंग प्रकरण आटोपले, नंतर पुण्यात एफआयआर दाखल झाला. ही चौकशी अँटी करप्शनकडे गेली. पुण्याच्या अँटी करप्शनने विस्तारित चौकशी केली. त्या चौकशीअंती एकनाथ खडसे निर्दोष आहेत. या प्रकरणात काहीही तथ्य नाही, असा अहवाल अँटी करप्शनने न्यायालयात सादर केल्याचे खडसे यांनी सांगितले. जावयाला अटक केल्यावरूनही त्यांनी भाजपावर टीका केली.

‘आकसापोटी कारवाई’

नाशिकच्या अँटी करप्शनने चौकशी केली. त्यांनीही क्लोजर रिपोर्ट सादर करत यात तथ्य नसल्याचे सांगितले. आता याच प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. म्हणजे एकाच प्रकरणाच्या अशा चौकशा केल्या जात आहेत. काहीही तथ्य नसताना शोधा, असे सांगणे म्हणजे निव्वळ आकसापोटी आणि राजकीय सुडापोटी कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले. ईडी, सीबीआय, अँटी करप्शन अशा कारवाया सुरू आहेत. दाऊदच्या कुटुंबीयांशी संबंध असल्यावरून एटीएसची कारवाई झाली, असे एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचादेखील त्यांनी निषेध केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘ज्यांचे मीठ खाल्ले त्यांच्यावरच अशास्वरुपाचे उपकार?’

विविध तपास यंत्रणांच्या चौकशीत नाथाभाऊ निर्दोष सिद्ध झाल्यानंतरही केवळ छळ करण्याचा हा प्रकार आहे. जावयाला जेलमध्ये टाकणे ज्यांच्या घरी गिरीष महाजन, देवेंद्र फडणवीस लंडनला जेवण केले. तीन दिवस त्यांच्याकडे होते. ज्यांचे मीठ खाल्ले त्यांच्यावरच अशास्वरुपाचे उपकार त्यांनी केले. त्यामुळे केवळ छळवणूक सुरू आहे. कोणत्याही तपासामध्ये, चौकशीमध्ये तथ्य आढळत नसतानाही काहीतरी शोधा आणि नाथाभाऊंना जेलमध्ये टाका, यासाठी कारस्थाने सुरू आहेत. मात्र जनता हे सर्व पाहत आहे. निवडणुकीत जनता याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.