म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली, एकनाथ खडसे यांचा खोचक टोला
जालना येथील मराठा समाज आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या घटनेचे राज्यभरात प्रतिसाद उमटले. महाराष्ट्र पेटून उठतोय. ही भीती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटली.लाठीमार झाल्याबद्दल फडणवीस यांनी माफी मागितली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
जालना : जालना आंदोलन प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शासनाची भूमिका स्पष्ट केली. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन दिलं. जालना येथील पोलीस अधीक्षक यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. शासन आंदोलकांशी चर्चा करण्याचे प्रयत्न करत आहेत. जालना येथील मराठा समाज आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या घटनेचे राज्यभरात प्रतिसाद उमटले. महाराष्ट्र पेटून उठतोय. ही भीती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटली. लाठीमार झाल्याबद्दल फडणवीस यांनी माफी मागितली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. घटना घडल्यावर लगेच माफी मागितली असती तर महाराष्ट्र पेटला नसता. माफी मागायची सवय देवेंद्र फडणवीस यांना करावी लागेल, असा निशाणाही एकनाथ खडसे यांनी लगावला.
म्हणून आली ही वेळ
धनगर समाज असेल किंवा इतर समाजाच्या आरक्षणाबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. मात्र ते तो पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना अशा पद्धतीने माफी मागण्याची वेळ आज राज्याच्या गृहमंत्री पदावर असताना आज आली आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
अजित पवार यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे
अजित पवार यांनी ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना सर्व अधिकार आहेत हे त्यांनी आधी सिद्ध करावे. लाठीमार केल्याच्या घटनेची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. जालना येथील लाठीचार्ज केल्याच्या घटनेत पोलिसांना शासनाच्या आदेश होते, हे सिद्ध करून दाखवावे. असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.
मराठा आंदोलन आणि झालेला लाठीमार हे सर्व लाईव्ह टेलिकास्ट आहे. सिद्ध करण्याची काय गरज आहे, असासुद्धा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना लाठीमार करायला लावणं. त्या करायच्या सूचना देणे आणि माफी मागव लागणंही सरकरच्या दृष्टीने नामुष्की आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी सरकारवर केली आहे.