‘…तर मी राजीनामा देतो असं सागितलं’, एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट

“माझं हेच तर म्हणणं आहे, पंधरा-वीस वर्ष झाले आहेत. अथांग पाणी, तुम्ही आज जर आलात तर पाणी पाहून तुमचाही जीव जळेल इतकं पाणी याठिकाणी दिसत आहे. त्या सरकारचा थेंब ना थेंब पाण्याची उपसा करण्याची सरकारची इच्छा नाही, ते पाणी उपसून शेजारच्या शेतामध्ये टाका, इतका ऊस आणि पाणी होईल की सांगता येणार नाही. पण ते होत नाही, त्यामुळे मला आता या उदासीनतेमुळे शब्दच सूचत नाहीत", अशी भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

'...तर मी राजीनामा देतो असं सागितलं', एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट
एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 2:17 AM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. एकनाथ खडसे यांनी नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली. एकनाथ खडसे यांनी यावेळी एक किस्सा सांगितला. एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच नदीवर बॅरेज बांधण्याची संकल्पना आणली. खडसे त्यावेळी पाटबंधारे मंत्री होते. विशेष म्हणजे तापी धरणावर पहिलं बॅरेज बांधलं तेव्हा अनेकांची मनस्थिती नकारात्मक होती. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी रिस्क घेत बॅरेज बांधण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय यशस्वी ठरेल का? याबाबत साशंकता होती. यावेळी खडसे यांनी सर्व अभ्यास करुन मोठी रिस्क घेतली. “बॅरेज वाहून गेलं तर राजीनामा देवून टाकेन. तुम्ही हे धरणं बांधा”, असं आपण सांगितल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

“तापीमध्ये एकही धरण होणार नाही हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. मी पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर ते होऊ कसं शकत नाही? तिथे खरोखर धरण होऊ शकत नाही, असं माझ्या लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की, त्या ठिकाणी बॅरेज बांधावं. बॅरेज बांधताना चर्चा केली तेव्हा लोकांना भीती वाटायचं की, ते बॅरेज वाहून गेलं तर? एकदम पाणी आलं तर? मी म्हटलं बॅरेज वाहून गेलं तर राजीनामा देवून टाकेन. तुम्ही हे धरणं बांधा. सारंगखेडा, सोरवाडा, प्रकाशा, सोयगाव, पाडळसरे हे धरण आणि बॅरेजेस मान्य केलं. बॅरेजेस ही संकल्पना या महाराष्ट्रात मी पहिल्यांदा राबवली. नंतर शरद पवारांनी बोलावलं. त्यांनी स्वत: त्याबाबत माहिती घेतली. नंतर त्यांनी तिकडे बॅरेजच्या धरणांची सुरवात केली. बॅरेज हा मान्यताप्राप्त विषयच नव्हता. पण तो मी अंगावर घेऊन केला होता. ते वाहून गेलं असतं तर मला घरीच बसावं लागलं असतं, अशी परिस्थिती होती. पण खान्देशासाठी करावं म्हणून मी केलं”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

‘मला आता या उदासीनतेमुळे शब्दच सूचत नाहीत’

बॅरेज आहेत तिथे शासनाचा उपसासिंचन प्रकल्पच अजून का झाला नाही? असा प्रश्न खडसेंना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “माझं हेच तर म्हणणं आहे, पंधरा-वीस वर्ष झाले आहेत. अथांग पाणी, तुम्ही आज जर आलात तर पाणी पाहून तुमचाही जीव जळेल इतकं पाणी याठिकाणी दिसत आहे. त्या सरकारचा थेंब ना थेंब पाण्याची उपसा करण्याची सरकारची इच्छा नाही, ते पाणी उपसून शेजारच्या शेतामध्ये टाका, इतका ऊस आणि पाणी होईल की सांगता येणार नाही. पण ते होत नाही, त्यामुळे मला आता या उदासीनतेमुळे शब्दच सूचत नाहीत. या गोष्टीच्या वेदनाही होत असतात. कारण त्याची मूहुर्तमेढ मी रोवलेली आहे. मी त्यातील बऱ्याचशा धरणाची कामे स्वत:हून पुढाकार घेऊन केलेली आहेत. मग ते आमच्या जळगाव जिल्ह्यातील पूर्ण प्रकल्प असोत, धुळे जिल्ह्यातील असोत, नंदुरबार जिल्ह्यातील असोत किंवा आणखी महाराष्ट्रातील इतर भागातील असोत. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं नागपूरचं धरण असेल त्याचं मी भूमीपूजन केलं होतं. पण त्या कालखंडात ज्यांचं भूमीपूजन केलं त्यापैकी काही पूर्ण झाले तर काही अपूर्ण राहिले”, अशी माहिती खडसेंनी दिली.

हे सुद्धा वाचा

‘माझी तिकडे शेती आहे का?’

आपल्यासारखे प्रतिभावंत नेते असल्यावर सुद्धा खान्देशाचा विकास का मागसलेला आहे? असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला. “विकास हा एकाने होत नसतो. विकासासाठी सामूहिक प्रयत्न लागतात आणि सर्वांची इच्छाशक्ती लागते. नाथाभाऊने केलं म्हणजे मग त्याला विरोध करणारे चार लोकं असतात. पण तो कशासाठी आणि कुणासाठी प्रकल्प आहे? नार-पारचा आणि माझा काय संबंध आहे? माझी तिकडे शेती आहे का? मग मी नार-पारसाठी का भांडतो आहे? राज्यातील अनेक भागांमध्ये सिंचनाचं काम केलं. मग पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात माझी जमीन आहे का? माझी तिकडे एक एकरही जमीन नाही. पण माझा शेतकरी आहे, माझा महाराष्ट्र आहे ही भावना माझ्या मनात असल्यामुळे मी प्रयत्न केला. माझी आजही इच्छा आहे की, ठिक आहे, कुणाचंही सरकार येवो, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. 10 वर्ष तुम्ही सिंचनाला द्या. महाराष्ट्र नाही बदलला आणि शेतकरी समृद्ध नाही झाला, त्याला आत्महत्या करायची वेळ येणार नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.